Sony Zee Deal : देशातील सर्वात मोठा मीडिया-एंटरटेनमेंट करार म्हणजेच सोनी आणि झी एंटरटेनमेंट यांच्यातील करार (Sony Zee Deal) अडचणीत सापडला आहे. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांना आता डील ब्रेकिंगचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. या बातमीनंतर आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या Viacom 18 समोरचं मोठं आव्हान संपलं असून मीडिया तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानी हेच किंग असतील हे स्पष्ट झालंय.
सोनी पिक्चर्स देशातील सर्वात जुने खाजगी मीडिया हाऊस झी ग्रुपकडून मनोरंजन व्यवसाय खरेदी करणार होते. परंतु आता हा करार अडचणीत सापडला आहे. सोनी पिक्चर्सने नुकतेच झी ग्रुपला हा करार रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे. या संपूर्ण घटनेचा सर्वात जास्त फायदा कोणाला होत असेल तर तो अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांना. आता सोनी-झी डील तुटल्यामुळे मुकेश अंबानींना मोठा नफा मिळणार आहे.
सोनी-झी डील तुटल्याचा फायदा अंबानींना
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मीडिया हाऊसमध्ये मोठी गुंतवणूक आहे. Viacom 18 ही त्यांच्या मालकीची कंपनी आहे. अलीकडेच त्याच्या कंपनीने स्टार नेटवर्क विकत घेण्यासाठी Disney कडून एक बंधनकारक सामंजस्य करार केला आहे. या करारानंतर, Viacom 18 कडे Star Network च्या सर्व चॅनेल आणि Disney + Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे मालकी हक्क असतील. अशा परिस्थितीत सोनी आणि झी यांना कडवी टक्कर दिली जाऊ शकत होती. पण ताज्या बातमीनंतर ती शक्यताही मावळली आहे.
जाहिरातींचं गणित बिघडलं
जर सोनी आणि झी यांच्यात करार झाला असता, तर देशातील सर्वात मोठे मीडिया नेटवर्क म्हणून त्यांचा उदय झाला असता आणि त्याला जाहिरात विश्वात मोठा वाटा मिळाला असता. त्याच वेळी Zee5 आणि Sony Liv सारख्या OTT प्लॅटफॉर्मची लायब्ररीही तशीच असती. म्हणजेच डिजिटल स्पेसमध्येही त्याचा झेंडा उंचावला असता.
हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी व्यवहार करताना ते स्वत:च्या फायद्याची वाटाघाटी करू शकते. पण आता डील ब्रेकिंगमुळे केवळ सोनी आणि झीलाच नुकसान होणार नाही तर HUL आणि P&G ला देखील इतर प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
Viacom 18 चा वाटा वाढणार
दुसरीकडे, Viacom 18 आणि Disney यांच्यातील करार पूर्ण झाल्यास, नवीन कंपनीकडे एकूण 115 टीव्ही चॅनेल आणि दोन OTT प्लॅटफॉर्म असतील. सध्या स्टार इंडियाकडे 77 चॅनेल आहेत आणि वायकॉम 18 चे 38 चॅनेल आहेत. ईटीच्या एका वृत्तानुसार, यामुळे उत्तर भारतातील शहरांमधील हिंदी चॅनेलचा एक तृतीयांश हिस्सा मुकेश अंबानींना मिळेल आणि दक्षिण भारतातील तामिळ बाजारपेठेत एक चतुर्थांश वाटा मिळेल.
मुकेश अंबानींनी आयपीएलचे डिजिटल अधिकार स्वतःकडे ठेवून ते लोकांसाठी मोफत ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे. अशाप्रकारे डिस्नेसोबतच्या डीलमध्ये त्यांना ईएसपीएनचे मालकी हक्क मिळतील. त्यासोबतच स्टार स्पोर्ट्सच्या एकापेक्षा जास्त चॅनलही त्याच्या खात्यात नोंदणीकृत होतील.
मुकेश अंबानी अशा प्रकारे नफा कमावतील
मनोरंजन आणि क्रीडा वाहिन्यांच्या मोठ्या नेटवर्कच्या मालकीमुळे, मुकेश अंबानी जाहिरातींच्या बाजारपेठेत चांगली कमाई करतील. भारतात क्रिकेटची क्रेझ कोणापासून लपलेली नाही. त्याच वेळी आयपीएल आणि अनेक जागतिक खेळांच्या डिजिटल अधिकारांमुळे त्यांचे उत्पन्न देखील वाढेल. दूरसंचार आणि किरकोळ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून रिलायन्सला स्वतःच्या जाहिराती स्वस्त ठेवण्यास मदत होईल. परंतु Viacom18 वर इतर कंपन्यांचे अवलंबित्व वाढेल.
Sony-Zee चा करार का मोडला?
सोनी आणि झी यांच्या विलीनीकरणाचा करार गेल्या दोन वर्षांपासून अनेक नियामक गुंतागुंतीमध्ये अडकला आहे. झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा आणि त्यांचा मुलगा पुनित गोयंका यांच्यावर पब्लिक लिस्टेड कंपनीतील निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. अशा परिस्थितीत सोनीची मूळ जपानी कंपनी 'कॉर्पोरेट-गव्हर्नन्स'च्या कोणत्याही प्रकरणात अडकू इच्छित नाही, त्यामुळे त्यांनी हा करार रद्द केला असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा :