एक्स्प्लोर

Silver Price: चांदीचे भाव गगनाला भिडणार; आयात नियमांत मोठा बदल; दरवाढीची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केलं भाकित

Silver Price: सरकारने चांदीच्या आयात नियमांमध्ये बदल केला आहे, ज्यामुळे बाजारातील पुरवठा आणि किमतींवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी येत्या काळात चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार होण्याची दाट शक्यता व्यक्त केलेली आहे.

Silver Price Update: तुम्हीही चांदीमध्ये गुंतवणूक करता का आणि दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करत आहात? किंवा चांदीच्या वाढत्या किमतींमुळे तुमचा देखील गुंणतवणूक करावी की नाही अशा विचारात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारने सोने चांदीच्या (Silver Price) आयात नियमांना अधिक कडक केले आहे. सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आणि ड्युटी-फ्री मर्यादेत बदल केल्यानंतर आता सरकारने चांदीच्या व्यवसायाबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने चांदीच्या विटा (सिल्ल्या) आणि इतर अर्ध-निर्मित चांदीच्या उत्पादनांच्या आयातीला प्रतिबंधित (restricted) श्रेणीत टाकले आहे. यामुळे येत्या काळात देशात चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळू शकते.(Silver Price)

Silver Price: सरकारचा नवा निर्णय काय आहे?

सरकारने १६ मे २०२६ पासून ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या चांदीच्या विटा आणि चांदीच्या इतर अर्ध-निर्मित रूपांच्या आयातीला प्रतिबंधित श्रेणीत ठेवले आहे. याचा अर्थ असा की आता यांची आयात पूर्वीसारखी सहज होऊ शकणार नाही. गेल्या वर्षी भारताच्या एकूण चांदीच्या आयातीत या दोन्ही श्रेणींचा वाटा जवळपास ९० टक्के होता.

Silver Price: सरकारने हे पाऊल का उचलले?

या निर्णयाचा मुख्य उद्देश देशावरील वाढणारा आयातीचा बोजा कमी करणे हा आहे. मिडल ईस्ट (मध्य-पूर्व) मधील तणाव, डॉलरची मजबुती आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताच्या आयात खर्चात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Silver Price: चांदीच्या आयातीवर किती खर्च होतो?

व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताने चांदीच्या आयातीवर १२ अब्ज डॉलर खर्च केले. तर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हा आकडा ४.८ अब्ज डॉलर होता. म्हणजेच एका वर्षात चांदीच्या आयात खर्चात मोठी झेप नोंदवली गेली आहे.

Silver Price:  एप्रिल महिन्यात आयातीत मोठी वाढ

एप्रिल २०२६ मध्ये चांदीच्या आयातीत १५७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा ४११ दशलक्ष (मिलियन) डॉलर होता. भारत प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंगडम (UK) आणि चीनमधून चांदीची आयात करतो.

Silver Price:  आयात पूर्णपणे बंद झाली का?

LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांच्या मते, याचा अर्थ असा नाही की भारताने चांदीची आयात पूर्णपणे बंद केली आहे. आता चांदीची आयात फक्त खालील माध्यामातूनच केली जाऊ शकते.

आरबीआयशी (RBI) जोडलेल्या बँका

डीजीएफटी-मान्यताप्राप्त (DGFT-approved) संस्था

बुलियन एक्सचेंजशी जोडलेल्या नामांकित एजन्सीजच्या माध्यमातूनच केली जाऊ शकेल.

Silver Price: चांदीच्या किमती वाढणार का?

तज्ज्ञांचे असे मत आहे की, देशांतर्गत (घरेलू) बाजारात किमतींवर याचा परिणाम होऊ शकतो. पुरवठा मर्यादित झाल्यास चांदीचे प्रीमियम वाढू शकतात, म्हणजेच भारतीय ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागू शकते. तर आंतरराष्ट्रीय बाजारावर याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण भारत हा मोठा खरेदीदार नक्कीच आहे, पण जागतिक किमती तो ठरवत नाही.

Silver Price: सरकारचा खरा उद्देश काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, हे पाऊल केवळ चांदीपुरते मर्यादित नाही. सरकारचा मुख्य उद्देश परकीय चलन साठ्यावरील (फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह) दबाव कमी करणे आणि डॉलरचा ओघ नियंत्रित करणे हा आहे.

Silver Price: भारतातील चांदीची सध्याची किंमत

सध्या भारतात चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत:

१ किलो चांदी - ₹२.८० लाख

१०० ग्रॅम - ₹२८,०००

१० ग्रॅम - ₹२,८००

१ ग्रॅम - ₹२८०

मे २०२६ मध्ये आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये सुमारे १० टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
तुमचं खातं कोणत्या बँकेत? SBI ने घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर माहिती
तुमचं खातं कोणत्या बँकेत? SBI ने घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर माहिती
1999 पासून तयारी, 27 वर्षाचा संघर्ष, वयाच्या 59 व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन 
1999 पासून तयारी, 27 वर्षाचा संघर्ष, वयाच्या 59 व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन 

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Embed widget