मुंबई : आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आजच्या या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, डोंबिवली अशा मतदारसंघांतही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील एकूण 13 जागांसाठी मतदान होत आहे. गेल्या चार टप्प्यांतील मतदारानाची टक्केवारी फारसी चांगली नाही. त्यामुळेच या पाचव्या टप्प्यात चांगले मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार बंद राहणार का? असे विचारले जात आहे. 


आज शेअर बाजार बंद


या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) सोमवारी (20 मे) बंद राहणार आहे. या दिवशी कोणतीही ट्रेडिंग होणार नाही. याबाबत एनएसईने एक अधिसूचना जारी केली होती. 20 मे रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्यामुळे ड्रेडिंग हॉलिडे असेल, असे या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. बीएसईच्या संकेतस्थळानुसार इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी तसेच करन्सी सेगमेंट सोमवारी बंद असतील. शेअर बाजाराची 20  मे रोजीची ही सुट्टी नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 1881 च्या कलम 25 अंतर्गत देण्यात आली आहे. 


आठवड्यात फक्त चार दिवस शेअर बाजार चालू


शेअर बाजाराला प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. काही सार्वजनिक सुट्ट्यांनाही शेअर बाजाराला सुट्टी दिली जाते. त्या दिवशी कामकाज बंद असते. या महिन्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होता. या महिन्यातील 20 मे रोजीची ही दुसरी सुट्टी आहे. या आठवड्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच या आठवड्यात फक्त चार दिवस शेअर बाजार ट्रेडिंगसाठी चालू असेल. 


महाराष्ट्रात 20 मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान 


महाराष्ट्रात आज पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे रोजी याआधीचे चार टप्पे पार पडले होते. आज महाराष्ट्रातील धुळे, डिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई ईशान्य, पालघर या मतदारसंघासाठी मतदान होत आहे.


2024 साली या दिवशी असणार शेअर बाजार बंद 


17 जून 2024: सोमवार, बकरी ईद
17 जुलै 2024: बुधवार, मोहर्रम
15 ऑगस्त 2024: गुरुवार, स्वातंत्र्यदिन 
2  ऑक्टोबर 2024: बुधवार, महात्मा गांधी जयंती
1 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, दिवाळी लक्ष्मी पूजन
15 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, गुरुनानक जयंती
25 डिसेंबर 2024: बुधवार, ख्रिसमस


हेही वाचा :


क्लेम सेटलमेंटबाबत EPFO चा नवा नियम, 'या' निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार!


रेल्वेच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स घेतल्यास पडणार पैशांचा पाऊस, दु्प्पट, तिप्पट रिटर्न्स मिळणार?