IPL 2024 Longest Six: आयपीएल 2024 च्या हंगामातील प्ले ऑफच्या फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स (KKR), सनरायझर्स हैदराबाद (SRH), राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता पहिला क्वालिफायरचा सामना 21 मे रोजी होणार आहे. त्याआधी या हंगामात सर्वात लांब षटकार कोणी लगावला जाणून घ्या...
एमएस धोनी- 108 मीटर
आयपीएल 2024 मधील आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नईच्या एमएस धोनीने सर्वात लांब म्हणजे जास्त अंतराचा षटकार लगावला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धोनी 13 चेंडूत 25 धावा केल्या. यावेळी धोनीने 110 मीटरचा षटकार लगावला.
दिनेश कार्तिक- 108 मीटर
दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी यंदाच्या हंगामात फिनिशरची भूमिका निबावली. जेव्हा सनयाझर्स हैदराबादने 288 धावांचं लक्ष्य दिलं होतं, तेव्हा दिनेश कार्तिकने 35 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. या खेळीत 7 षटकार दिनेश कार्तिकने लगावले होते. यामध्ये 108 मीटरचा षटकार होता.
निकोलस पूरन- 106 मीटर
निकोलस पूरन आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायट्स संघाकडून खेळत आहे. पूरनने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 106 मीटरचा षटकार लगावला होता. या सामन्यात पूरनने 21 चेंडूत 40 धावा केल्या होत्या.
व्यंकटेश अय्यर- 106 मीटर
व्यंकटेश अय्यरने या हंगामात 106 मीटरचा षटकार टोलावला. बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात व्यंकटेशने 30 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. या खेळीत व्यंकटेशने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. यंदाच्या हंगामात व्यंकटेश अय्यरने 12 सामन्यात 267 धावा केल्या.
हेनरिक क्लासेन- 106 मीटर
हेनरिक क्लासेनने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. क्लासेनने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 106 मीटरचा षटकार लगावला. हैदराबादकडून सर्वोच्च धावसंख्या करण्यामध्ये हेनरिक क्लासेनचे मोठं योगदान होतं. या सामन्यात त्याने 31 चेंडूत 67 धावांची खेळी केली होती.
प्ले ऑफचं वेळापत्रक
21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर २ विजेता, चेन्नई ( फायनल)
विराट कोहलीचा भीमपराक्रम-
विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे. एबी डिव्हिलियर्सने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1960 धावा केल्या आहेत.