मुंबई : शेअर मार्केटमध्ये असे काही गुंतवणूकदार असतात जे गुंतवणूक करण्याआधी कंपन्यांचा सखोल अभ्यास करतात. अभ्यास करून योग्य त्या कंपनीत पैसे गुंतवून हे गुंतवणूकदार मोठी कमाई करतात. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तसेच या देशाची भौगोलिक स्थितीदेखील वेगळी आहे. पण एवढी सारी विविधता असूनही संपूर्ण भारतात रेल्वे जाळे पसरलेले आहे. म्हणूनच भारतीय रेल्वे हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. तुम्हीदेखील शेअर बाजारात कमाई करत असाल तर रेल्वेशी संबंधित स्टॉकवर लक्ष ठेवायला हवे. सध्या रेल्वेशी संबंधित अशा सात कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात. 


...तर भविष्यात चांगले रिटर्न्स मिळणार


रेल्वेशी निगडीत असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. निवडणुकीच्या या काळात रेल्वेशी संबंधित काही स्टॉक्स 200 टक्क्यांपर्यंत मजबूत झालेले आहेत. म्हणूनच शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते रेल्वेशी संबंधित स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. 


एका महिन्यात 44 टक्के रिटर्न्स


रेल्वेशी संबंधित अनेक शेअर्सचे नुकतेच रेटिंग झाले आहे. यातील बहुसंख्य कंपन्यांचे शेअर्स हे एक, दोन किंवा मागील पाच वर्षांच्या तुलनेत थेट पाच पट झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अजूनही रेल्वेशी संबंधित कंपन्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देऊ शकतात. यातील काही कंपन्यांनी गेल्या एका आठवड्यात साधारण 25 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. याच शेअर्सने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 44 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 


या शेअर्सची करा खरेदी 


शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार गुंतवणूकदारांनी टिमकेन इंडिया, टीटागड रेल सिस्टम, आयआरसीटीसी, टॅक्समेको रेल, आयआरएफसी तसेच रेल विकास निगम या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायला हवेत. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स विकले पाहिजेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


क्लेम सेटलमेंटबाबत EPFO चा नवा नियम, 'या' निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार!


मृत्यूनंतर व्यक्तीच्या आधार कार्डचे काय करावे? ते सरकारला परत करता येते का? वाचा नेमकं काय करावं?


पैसे कमवण्याची संधी चुकवू नका, नव्या आठवड्यात दोन नवे आयपीओ येणार!