Share Market Update:  आज मंगळवारी  शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे.  अमेरिकन बाजारातील संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले असून शेअर खरेदीचे संकेत मिळत आहेत. 


आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली. निफ्टी एक टक्क्यांनी वधारत 17,121 अंकावर सुरू झाला. सेन्सेक्समधील 30 शेअरचा निर्देशांक 485.35 अंकानी वधारत 57,066.24 अंकावर सुरू झाला. 


निफ्टीतील 50 पैकी 49 शेअर्सचे दर वधारले आहेत. हिंदाल्कोचा शेअर दर 0.55 टक्क्यांनी घसरला आहे. तर, बँक निफ्टीमध्ये 474 अंकानी उसळण घेतली आहे.  बँक निफ्टी 36,557  या अंकावर व्यवहार करत आहे. 



ऑटो क्षेत्रातील शेअर्स वधारले 


आज ऑटो क्षेत्रातील शेअर्स चांगलेच वधारले आहेत. ऑटो निर्देशांक दोन महिन्यातील उच्चांकावर व्यवहार करत आहेत. बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये 2.85 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. बँकिंग शेअर्समध्ये आयसीआयसीआयमध्येदेखील तेजी दिसत आहे. टाटा मोटर्समध्ये 2.38 टक्के, हिरो मोटोकॉर्पमध्ये 2.35 टक्क्यांची उसळण दिसून आली आहे. 


सोमवारी शेअर बाजाराची काय स्थिती होती?


सोमवारी शेअर बाजारात दिवसभर विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ट्रेंड दिसून आला. 


सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26  अंकानी घसरला. जवळपास 1.08 टक्क्यांची घसरण होऊन सेन्सेक्स 56,579.89 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, निफ्टी इंडेक्स 218 अंक म्हणजे 1.27 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 16,953.95 अंकावर बंद झाला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: