Share Market Updates: आज शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत आहे. सेन्सेक्स आज 470 अंकांनी वधारला.  निफ्टीतही 151.10 अंकानी वधारला आहे. आशियाई शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. 


आज शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 4710 अंकानी वधारत 57,296.31 अंकावर सुरू झाला. निफ्टी 151.10 अंकाची उसळण घेत 17,189.50 वर सुरू झाला. 


निफ्टी 50 मधील 42 शेअर वधारले आहेत. तर उर्वरित आठ शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीतही तेजीचे संकेत दिसत आहे.  बँक निफ्टी 36068 अंकावर व्यवहार करत आहे. 


आज शेअर बाजारातील ऑईल अॅण्ड गॅस, एनर्जी, मेटलच्या स्टॉक्समध्ये तेजी दिसत आहे. मीडिया क्षेत्रातील स्टॉक्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील स्टॉक्स वधारले आहेत. ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअरमध्ये 1.07 टक्के, फार्मा शेअरमध्ये 1.05 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे. एफएमसीजीमध्ये 0.92 टक्के आणि मेटल शेअरमध्ये 0.68 टक्के तेजी दिसत आहे. 


आशियाई बाजारात आज तेजी दिसून येत आहे. जपानच्या निक्केई निर्देशांकात 0.61 टक्के, कोरियाचा कोस्पीचा निर्देशांक 0.55 टक्क्यांनी वधारला आहे. चीनच्या शांघाई शेअर बाजारात 0.67 टक्क्यांची तेजी आहे. तर, हाँगकाँगमधील हँगसेंग निर्देशांकात 1.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिंगापूर शेअर बाजारात आजही तेजी दिसून येत आहे. 


दरम्यान, बुधवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 537 अंकांनी तर निफ्टीही 162 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,819 अंकावर निफ्टीमध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,038 अंकावर बंद झाला. बुधवारी 1146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर, 2140 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 107 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: