नवी दिल्ली  : भारतीय शेअर बाजारात आज दिवसभर तेजी पाहायला मिळाली. बुधवारी दिवसभर सेन्सेक्स 51 हजारांहून अधिक अकांनी व्यवहार करताना दिसून आला. दिवसभर ज्या तेजीत सेन्सेक्स व्यवहार करत होता त्याच तेजीत तो बंद झाला. सेन्सेक्सबरोबर निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली.

आज सेन्सेक्समध्ये 254.03 अंकाची म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. दिवसअखेरक्स 51279.51 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीत 76.40 अंकाची म्हणजे 0.51 टक्क्यांची वाढ होत 15174.80 अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्सने आज 51048.93 ची नीचांकी पातळी गाठली. त्याचवेळी त्याने 51430.43 ची उच्चांक गाठला. त्याचवेळी, निफ्टीने 15100.85 ची नीचांकी गाठली, तर त्याचवेळी 15218.45 ची उच्च पातळी गाठली. आज दिवसभर बीएचईएल, आयडीबीआय बँक, एमटीएनएल आणि व्होडाफोन आयडिया यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात व्यापार करताना दिसले.

Wipro | विप्रोने तब्बल 105 अब्ज डॉलरला खरेदी केली ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म Capco

कशी होती आजची स्थिती? कुणाला झाला फायदा?

याशिवाय, पीएसयू बँकांमध्ये थोडा दबाव पाहायला मिळाला.  तर पीएसयू बँक निर्देशांक थोड्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी एनर्जीतही 53.90 अंकांची घसरण दिसून आली. त्याचबरोबर मेटल, आयटी आणि फार्मा इंडेक्समध्ये आज 1.50 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली.

आज बाजारात जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स या कंपन्यांनी अव्वल फायदा मिळविला. याशिवाय एसबीआय लाइफ इन्शुरन्स, ओएनजीसी, आयओसी आणि एचडीएफसी लाईफ या कंपन्या आज सर्वाधिक तोट्यात राहिल्याचं दिसून आलं.  

भारत महाराष्ट्र क्रीडा पुणे वर-वधू UNCUT इतर SELECT LANGUAGE मुख्यपृष्ठ Business