मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरन यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे. गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली.
या प्रकरणाशी संबंधित सहा महत्वाच्या गोष्टी या एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणारे सचिन वाझे यांना अडचणीत आणणाऱ्या आहेत.
1. या प्रकरणामध्ये मनसुख हिरनची गाडीचा वापर झाल्यामुळे सचिन वाझेची अडचण वाढली. कारण सचिन वाझे हे मनसुखला आधीपासून ओळखत होते. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केली की सचिन वाझे यांच्या वॉट्स अॅप कॅालचा सीडीआर काढला तर या प्रकरणाचे सचिन वाझे कनेक्शन समोर येईल.
2. मनसुख हिरनच्या पत्नीने केलेले आरोप
मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला हिरनने एटीएसला दिलेल्या जबाबामध्ये असं म्हंटलं आहे की मनसुख हिरनची गाडी मागील चार महिन्यांपासून सचिन वाझे वापरत होते. तसंच विमला हिरन यांनी गंभीर आरोप करत एटीएसला माहिती दिली कि त्यांच्या पतीने त्यांना सांगितलं होतं की सचिन वाझे यांना या प्रकरणात अटक होण्यासाठी सांगितलं होतं.
3. वकील अशिष गिरी यांच्या कार्यालयात तयार केला गेलेला तक्रार अर्जमनसुख हिरन यांच्या पत्नीने असाही आरोप केला आहे की सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुनच त्यांच्या पतीने मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवलं होतं. या पत्राचा सगळा मजकूर सचिन वाझे यांच्या समक्ष तयार केला गेला. वकील अशिष गिरी हे टीआरपी केसमधील आरोपींचे वकील आहेत.
4. धनंजय गावडे कनेक्शनविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की मनसुख हिरन यांचे शेवटचे लोकेशन वसई तुंगारेश्वर जवळच आहे. तिथेच धनंजय गावडे नावाच्या माझी शिवसेना पदाधिकाऱ्याचं फार्म हाऊस आहे. धनंजय गावडे आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखतात आणि 2017 च्या एका खंडणीच्या केसमध्ये गावडे आणि वाझेसोबत आरोपी देखील आहेत असाही आरोप केला गेला आहे.
5. ओला टॅक्सी ड्रायव्हरचा जबाब17 तारखेला ज्या दिवशी मनसुख यांची स्कॉर्पीओ गाडी चोरी केली त्या दिवशी मनसुखने दक्षिण मुंबईला जाण्यासाठी ओला टॅक्सी केली. ओला टॅक्सी ड्रायव्हर अब्दुल मोकिमने पोलिसांना सांगितलं की मनसुखने गाडी Crawford market साठी बुक केली होती. इथेच मुंबई पोलीस आयुक्तालयही आहे आणि तिथेच सचिन वाझे बसतात. अब्दुलने पोलिसांनी सांगितलं की Crawford market जवळ पोहचल्यानंतर मनसुख ने Crawford market ऐवजी सीएसटीच्या दिशेला गाडी वळवली. अब्दुलने पोलिसांनी सांगितलं की मनसुख फोनवर सतत कोणाशी तरी बोलत होता.
6. ठाणे कनेक्शनअंबानी प्रकरणाचे सगळे कनेक्शन ठाण्याशी जुळतात. त्या रात्री गाडी ठाणे आणि मुंबईला आली आणि नंतर पांढरी इनोवा गाडी ठाण्यात परत गेली. गाडीचा मालक ठाण्याचा, मनसुखचा मृतदेहही ठाण्यात सापडतो आणि सचिन वाझे देखील ठाण्यातच राहायला आहेत.
संबंधित बातम्या :