बंगळुरु: भारतातील दिग्गज समजली जाणारी आयटी कंपनी विप्रोने ब्रिटनस्थित बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरची सेवा देणारी कंपनी Capco ची खरेदी तब्बल 105 अब्ज रुपयांना केली आहे. विप्रोने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरमध्ये येत्या काळात विप्रो भक्कमपणे पावले टाकेल असेही कंपनीच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे Capco च्या खरेदीमुळे या क्षेत्रातील नवीन ग्राहकांना कंपनी आकर्षित करेल असा आत्मविश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
Capco या ब्रिटनच्या कंपनीच्या 30 शाखा असून त्यामध्ये पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. विप्रोचा आणि Capco चा हा संपूर्ण व्यवहार कॅशच्या स्वरुपात होणार आहे. 30 जून 2021 पर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Azim Premji | अझीम प्रेमजींची दरियादिली, 1125 कोटींची मदत करणार
विप्रोकडून करण्यात आलेला हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. Capco चे मुख्यालय लंडनमध्ये आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरमध्ये जगभरातील कंपन्यांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.
गेल्या वर्षी शेवटच्या तिमाहीतील विप्रोच्या नफ्यात 20.8 टक्क्यांची भर पडली होती. या कंपनीचा शेवटच्या तिमाहीतील एकूण फायदा हा 2967 कोटी रुपये इतका होता. याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नात 1.3 टक्क्यांची वाढ झाली असून ती 15,670 रुपयांवर पोहोचली आहे.
coronavirus | विप्रोकडून पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी