Warren Buffett's Investment: शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचे आदर्श आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी कोरोना काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन मोठा नफा कमावला होता. त्यांनी जगातल्या आघाडीच्या तीन कंपन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. या तीन कंपन्यामधील दोन कंपन्यांतील गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. त्यांनी दोन कंपन्यात गुंतवणूक करुन केवळ दोनच महिन्यात 61 हजार कोटी रुपये कमावल्याचं समोर आलंय.
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीची अमेरिकन एक्सप्रेसमध्ये 18.8 टक्के गुंतवणूक आहे आणि बँक ऑफ अमेरिकामध्ये 11.9 टक्के गुंतवणूक आहे. या दोन गुंतवणुकीच्या माध्यमातून बफे यांनी जवळपास 61 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे.
या दोन कंपन्यांनी करुन दिला फायदा
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीची अमेरिकन एक्सप्रेसमध्ये 18.8 टक्के गुंतवणूक आहे. अमेरिकन एक्सप्रेस ही एक अमेरिकेची मल्टीनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे. डिसेंबर 2020 मध्ये वॉरेन बफे यांनी जवळपास 120 कोटी डॉलरची गुतंवणूक केली होती.
बराक ओबामा, बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्यासह 20 दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक
बर्कशायर हाथवे कंपनीची बँक ऑफ अमेरिकेत 11.9 टक्के गुंतवणूक आहे. वॉरेन बफे यांनी ही गुंतवणूक 1400 कोटी डॉलरमध्ये खरेदी केली होती. बँक ऑफ अमेरिका हे वॉरेन बफे यांचे आवडती स्टॉक आहे. ज्यावेळी ते जेपी मॉर्गनमधून आपली गुंतवणूक काढून घेत होते त्यावेळी ते बँक ऑफ अमेरिकामध्ये गुंतवणूक करत होते.
बँक ऑफ अमेरिका आणि अमेरिकन एक्सप्रेसमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून वॉरेन बफे यांना केवळ दोन महिन्यात तब्बल 61 हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं दिसून येतंय.
Stock Market News | शेअर मार्केट एक हजार अंकांनी कोसळलं, निफ्टीही 14,900 अंकाच्या खाली
Warren Buffett: दोन स्टॉक आणि दोन महिने, वॉरेन बफे यांनी कमावले तब्बल 61 हजार कोटी रुपये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2021 12:33 PM (IST)
Warren Buffett's Investment: शेअर मार्केटमधील 'बाप माणूस' समजले जाणारे वॉरेन बफे यांनी केवळ दोन महिन्यात दोन स्टॉकमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून तब्बल 61 हजार कोटी रुपये कमावले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -