मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनेक घडामोडी घडत आहेत. काही कंपन्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देत आहेत. तर काही कंपन्यांत गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांना नुकसान होत आहे. मात्र उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची रिलायन्स पॉवर (Reliance Power) सध्या शेअर बाजारात (Share Market) चांगली कामगिरी करताना दिसतेय. या कंपनीत मंगळवारी शेअर बाजारात 10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 28.68 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा शेअर 26.07 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या चार वर्षांत रिलायन्स पॉवर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2400 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. काही वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर फक्त एक रुपया होता. आज हाच शेअर 28.68 रुपयांवर पोहोचला आहे.


...तर एका लाखाचे झाले असते 25.37 लाख रुपये (What is Share Price Of Reliance Power)


रिलायन्स पॉवर या कंपनीचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 34.35 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील सर्वांत कमी मूल्य 13.80 रुपये आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी अनिल अंबानी यांच्या मालकीची आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचा शेअर फक्त 1.13 रुपये होता. आता 11 जून 2024 रोजी याच शेअरचे मूल्य 28.67 रुपयांवर पोहोचले आहे. रिलायन्स पॉवर या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 2400 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर याच एका लाखाचे आज 25.37 लाख रुपये झाले असते. 


शेअरमध्ये एका वर्षात 80 टक्क्यांनी वाढ  (Reliance Power Share Analysis)


रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या कंपनीचा शेअर 12 जून 2023 रोजी 15.85 रुपयांवर होता. आज म्हणजेच 11 जून 2024 रोजी हा शेअर 28.67 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळालेली आहे. या कंपनीचा शेअर 13 मार्च 2024 रोजी 20.38 रुपये होता. गेल्या पाच दिवसांत रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजना काय आहे? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर!


रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील 'या' कंपनीकडून लाभांश जाहीर, 1819 टक्क्यांनी रिटर्न्स देणारी कंपनी तुम्हाला करू शकते मालामाल!


शेअरची किंमत फक्त 9 रुपये, पण अनेकजण झाले मालामाल, 'ही' कंपनी भविष्यातही देणार चांगले रिटर्न्स?