मुंबई : शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. योग्य अभ्यास करून या कंपन्यांत गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला याच्या पोर्टफोलिओतील इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिडेट या कंपनीचादेखील अशा काही मोजक्या कंपन्यांत समावेश आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHC) ही सेवा क्षेत्रातील दक्षिण आशियातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ही कंपनी अनेक मोठे हॉटेल्स, रिसॉर्ट चालवते. यामध्ये विवांता, जिंजर, ताज, अमाया अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडने 1.75 रुपये प्रति शेअर प्रमाणे डिव्हिडेंड घोषित केला आहे. या डिव्हिडेंडसाठी 7 जून ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आलेली आहे. 


रेखा झुनझुनवाला यांची 2.09 टक्के हिस्सेदारी


रेखा झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. त्यांची या कंपनीत 2.09 टक्के हिस्सेदारी आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीने  1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 1.75 रुपये प्रति शेअरच्या डिव्हिडेंडची घोषणा केलेली आहे. 14 जून रोजी या कंपनीची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत डिव्हिडेंडच्या या निर्णयाला मंजुरी मिळू शकते. इंडियन हॉटल्स कंपनी आणि सीजी हॉस्पिटॅलिटी यांच्यात भागिदारी आणि सहकार्यासाठी करार झाला आहे. 


IHC च्या शेअर्सने सहा महिन्यांत दिले 32 टक्के रिटर्न्स 


सध्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा शेअर फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. पण गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. सहा महिन्यांच्या तुलनेत हा परतावा 32 टक्के आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.


चार वर्षांत 700 टक्क्यांनी रिटर्न्स 


कोरोना महासाथीच्या काळात 3 एप्रिला 2020 रोजी या कंपनीचा शेअर 67 रुपयांवर गेला होता. मात्र कालांतराने सावरत या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 30 रुपये होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 1819 टक्क्यांनी बम्पर रिटर्न्स मिळालेले आहेत.


हेही वाचा :


आयटीआर भरताना 'ही' चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत; वाचा सविस्तर!


पंतप्रधान आवास योजना काय आहे? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर!


HDFC चं मोठं गिफ्ट! 'या' एका निर्णयामुळे सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!