Pradhan Mantri Awas Yojana : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत देशात पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घर बांधण्यावर एकमत दर्शवण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा आर्थिक मदत केली जाते. PMAY अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, वीज, एलपीजी कनेक्शन, नळजोडणी अशा सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजना नेमकी काय आहे? या योजनेत कशाप्रकारे लाभ मिळतो? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊ या... 


What is Pradhan Mantri Awas Yojana : पीएम आवास योजना काय आहे? 


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घर बांधून दिले जाते. त्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना चालू करण्यात आली होती. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. गरिबांपासून ते मध्यमवर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आता या योजनेतून निधी दिला जातो. हा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेत अनेक गट पाडण्यात आलेले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. या कर्जावर अनुदानही मिळायचे. आता या कर्जाची मर्यादा 18 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


How to apply Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा? 


पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. 


त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता, हे अगदोर ठरवा. 


त्यानंतर http://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. 


मुख्य मेन्यूमध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा


त्यानंतर एक नवी विंडो उघडेल. तिथे तुमचा आधार नंबर टाका.


पुढे वैयक्तिक माहिती, बँक खात्यासंदर्भातील माहिती, तुमचा सध्याच्या घराचा पत्ता इद्यादी माहिती भरा


ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करा


Documents For Pradhan Mantri Awas Yojana : कोणकोणत्या कागदपत्रांची गरज 


पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रं असणं गरजेचं आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. यासह तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणेदेखील गरजेचे आहे. यामध्ये फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याचे स्टेटमेंट, आयटी रिटर्न्स तुमच्यकडे असणे गरजेचे आहे. 


हेही वाचा :


आयटीआर भरताना 'ही' चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत; वाचा सविस्तर!


पीएम शेतकरी सन्मान निधीचा 17 वा हफ्ता तुम्हाला मिळणार का? तुम्ही लाभार्थी आहात की नाही? 'या' सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या!


मोठी बातमी! 'गुगल पे' बंद, गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय