UPI Payment for Feature Phone : सध्या अनेक लोक ऑनलाइन पद्धतीनं पेमेंट करतात. त्यासाठी गूगल पे, फोन पे या अॅपचा वापर लोक करतात. आता स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर न करता तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. नुकतच RBI एक नवं फिचर लाँच केलं आहे.
ज्या लोकांना स्मार्टफोन वापरता येत नाही किंवा जे लोक महाग स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत, असे लोक फिचर फोनचा वापर करतात. फिचर फोनमध्ये टच स्क्रिन,इंटरनेट,अॅप्स इत्यादी फिचर्स नसतात. अशा लोकांसाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)नवं फिचर लाँच केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मंगळवारी (8 मार्च) नवं यूपीआय आधारित पेमेंट्स प्रोडक्ट लाँच केलं आहे. या फिचरमुळे फिचर फोन असणारे लोक डिजीटल पेमेंट करू शकणार आहेत.
आरबीआयनं मंगळवारी एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'आरबीआयचे गव्हर्नर हे 8 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता फिचर फोनसाठी यूपीआय सुविधा UPI123Pay आणि डिजीटल पेमेंट्साठी 24 तासांची हेल्पलाइन डिजीसाथी लाँच करत आहेत.' आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिसेंबर महिन्यामध्ये फिचर फोनसाठी डिजीट पेमेंटचे फिचर लाँच करण्याबाबतची घोषणा केली होती.
आरबीआयचं नवं फिचर विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. नव्या फिचरमुळे स्मार्टफोन आणि फिचर फोन धारक आता सहजपणे डिजिटल व्यवहार करू शकतील. फिचर फोनमध्ये UPI, म्हणजेच UPI123Pay ही तीन- स्टेपची प्रक्रिया आहे - कॉल करा, निवडा आणि पैसे द्या. पेमेंट करण्यापूर्वी फोन यूजरनं त्यांचे बँक खाते फिचर फोनसोबत लिंक करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे डेबिट कार्डचे यूपीआय पिन सेट केलेले असावे.
यूपीआय पिन सेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या फिचर फोनमधून डिजीटल पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ज्या व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीनं पैसे पाठवायचे असतील त्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. व्यवसायिकांना ऑनलाइन पद्धतीनं पेमेंट करण्यासाठी तुम्ही मिस कॉल करणे ही पेमेंटची पद्धत तुम्ही वापरू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Realme C35 Smartphone : Realme C35 स्मार्टफोन भारतात लॉन्च, चार कॅमेऱ्यांव्यतिरिक्त मिळतील 'हे' भन्नाट फीचर्स
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha