मुंबई : भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण होत बाजार बंद झाला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर दोन दिवस तेजी भारतीय शेअर बाजारात दिसून आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळेल. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाल्याचं चित्र दिसून आलं. बीएसई 237.8 अंकानं म्हणजेच 0.29 टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाला. 


टॉप 10 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं


शेअर बाजारातील बाजार मूल्य हा निकष लावल्यास सर्वात मोठ्या अशा टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचं बाजारमूल्य घटलं आहे. दुसरीकडे टाटा कन्सल्टिंग एजन्सी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि भारतीय स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 


कोणत्या कंपन्यांचं बाजारमूल्य घटंल?


रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 74,563.37 कोटी रुपयांनी घसरुन 17,37,556.68 कोटी रुपयांवर आलं आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 26,274.75 कोटींनी घसरुन 8,94,024.60 कोटी इतकं झालं. याप्रमाणं आयसीआयसीआयचं बाजारमूल्य 22,254.79 कोटी रुपयांनी घसरुन 8,88,432.06 कोटी रुपये झालं तर आयटीसीचं बाजारमूल्य 15,449.47 कोटी रुपयांनी घसरुन 5,98,213.49 करोड रुपये झालं. एलआयसीचं बाजारमूल्य 9,930.25 कोटी रुपयांनी तर हिंदुस्थान यूनिलिव्हरचं बाजारमूल्य 7,248.49 कोटी रुपयांनी कमी झालं. 


या कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं


देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचं बाजारमूल्य  57,744.68 कोटी रुपयांनी वाढून  14,99,697.28 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं. इन्फोसिसचं बाजारमूल्य 28,838.95 कोटी रुपयांनी वाढून  7,60,281.13 कोटी रुपयांवर पोहोचलं.  भारतीय स्टेट बँकेचं बाजारमूल्य 19,812.65 कोटी रुपयांनी वाढून 7,52,568.58 कोटींवर पोहोचलं आहे. 


देशातील सर्वात मोठी कंपनी कोणती ?


नुकत्याच संपलेल्या आठवड्यात मोठी घसरण होऊन देखील  रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजारमूल्य विचारात घेता सर्वात मोठी कंपनी आहे. यानंतर टिसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान लिव्हर, एलआयसीचा क्रमांक आहे.  


 इतर बातम्या :



 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)