Elon Musk wealth: एलन मस्क यांच्या संपत्तीत (Elon Musk wealth) मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. 5 नोव्हेंबरपासून एलन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एलन मस्कच्या कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये देखील मोठी वाढ जाली आहे. शेअर्समध्ये 4 नोव्हेंबरपासून 32 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 84.7 अब्ज डॉलर्सची वाढ
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांना त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फायदा झाला आहे. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुका जिंकत आहेत. तेव्हापासून एलन मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एलन मस्क यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. 5 नोव्हेंबरपासून इलॉन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, 5 नोव्हेंबर रोजी एलोन मस्कची एकूण संपत्ती 264 अब्ज डॉलर होती. जी सध्या 314 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याचा अर्थ एलन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.20 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर शुक्रवारी एलन मस्कच्या संपत्तीत 17 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जर आपण चालू वर्षाबद्दल बोललो तर एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 84.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
3 वर्षांनंतर 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार
एलन मस्कची एकूण संपत्ती आता 300 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. तब्बल 3 वर्षानंतर एलन मस्कची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये, एलन मस्कची एकूण संपत्ती 300 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. पुढील आठवड्यात एलन मस्कची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
टेस्लाचे शेअर्स वाढले
एलन मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. 4 नोव्हेंबरनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, Nasdaq वर कंपनीचे शेअर्स 242.84 डॉलरवर होते. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रति शेअर 78.38 डॉलरची वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे समभाग 321.22 डॉलरवर आले आहेत. शुक्रवारी, कंपनीच्या समभागांमध्ये 8 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या समभागांनी 52 आठवड्यात 328.71 डॉलरची विक्रमी पातळी गाठली.
महत्वाच्या बातम्या: