Sushma Andhare on Amit Shah : अमित शाह (Amit Shah) तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढ खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. 70 हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या.
किरिट सोमय्या यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता भाजपमध्ये आहेत. आम्हाला आनंद आहे की अमित शाह त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट उध्दव ठाकरे यांच्या नावाने करतात. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठे भक्कम आव्हान हे उध्दव ठाकरेच वाटतात. ही आमच्यासाठी प्रचंड सकारात्ममक आणि लढण्यासाठी उर्जा देणारी बाब असल्याचे अंधारे म्हणाल्या. ठाकरे बाणा हा महाराष्ट्राला माहिती आहे. ते स्क्रिप्ट आणून पोपट पंची करत नाहीत. परंतू आम्हाला जे सावरकरांबद्दल सांगत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की राहुल गांधींच्या हातातले लाल संविधान बघून जे अर्बन नक्षली शब्द वापरला त्याचा अर्थ तुम्ही नुसता संविधानाचा अपमान केला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही तुम्ही अपमान केला आहे. त्यावर अमित शाहा काय बोलणार? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
अमित शाह तुम्ही आमच्या राज्यात येऊन आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाजवळ जाऊन जी खोटी शपथ घेतली. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला त्यामुळं आमच्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. यावर तुमचे काय म्हणणे आहे? इंदू मिलसाठी 10 वर्षापुर्वी कुदळ मारली त्या ठिकाणी एकही विट लागली नाही. त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? आरबी समुद्रात तुम्ही शिवस्मारक बांधणार होता ते झाले नाही यावर तुमचे म्हणणं काय आहे असे सवाल अंधारे यांनी केले. अमित शाह आमच्या राज्यात येऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत असेही अंधारे म्हणाल्या.
टिंगरे काय आहेत हे संपुर्ण मतदारसंघाला माहित आहे
नया नया मुल्ला जोरसे बांग देता है, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपचे नेते काय म्हणत होते, हे तुम्ही एका तुमची स्क्रिप्ट वाचणाऱ्या राज ठाकरेंनी पवार साहेबांच्या वाढदिवसादिवशी काय काय म्हणाले ते वाचत जा. मला माहिती आहे तुम्ही पोपट म्हणून राज ठाकरेंना वापरता असेही अंधारे म्हणाल्या. पाटणच्या एका आमदाराने मला आब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. त्यांना घाबरुन आम्ही काम करायला लागलो तर लोकशाही वाचेल कशी. इतके नोटीसांना घाबरणारे नाही. सुनिल टिंगरे का पोहोचले? रक्ताचे नमुणे कोणी बदलले? यावर मला बोलायला लावू नका मी संयम आणि शांत आहे. टिंगरे काय आहेत हे संपुर्ण मतदारसंघाला माहित आहे असेही अंधारे म्हणाल्या.
महिलांची अहवेलना करणाऱ्या धनंजय महाडीकांना लेकीबाळी चोखपणे उत्तर देतील
हे लोक ज्या पध्दतीने बोलतात त्यांच्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यांना असे वाटते की त्यांच्या बाबाजाद्यांची प्रॉपर्टी विकून इथल्या मायभगिनींना दौलतजादा केलीय. हे पैसे महाराष्ट्रातील लोकांनी दिलेले टॅक्सचे पैसे आहेत. महिलांची अहवेलना करणार असाल तर महाराष्ट्रातील लेकीबाळी चोखपने धनंजय महाडीकांना,उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असेही अंधारे म्हणाल्या.