एक्स्प्लोर

Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश, शेअरमध्ये घसरण सुरुच, अखेर तज्ज्ञ म्हणाले...

Share Market Crash : ओला इलेक्ट्रिकच्या  शेअरमधील घसरण काही थांबत नसल्याचं चित्र आहे. आज ओला इलेक्ट्रिकच्या शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात एका बाजूला सुरुवातीच्या घसरणीनंतर जोरदार तेजी दिसून आली. मात्र, ओला इलेक्ट्रिकच्या शेअरची स्थिती खराब असल्याचं पाहायला मिळालं. ओला इलेक्ट्रिकचा स्टॉक क्रॅश झाला आणि 52 आठवड्यांच्या निचांकावर पोहोचला. ओला इलेक्ट्रिक कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर  बनवल्या जातात. मात्र, या कंपनीच्या स्टॉकमधील घसरणीमुळं ब्रोकरेजकडून  आणि तज्ज्ञांकडून या स्टॉकच्या विक्रीचा सल्ला दिला जातोय. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 487 कोटींवर आला आहे.

Ola Electric Mobility Share : ओलाच्या शेअरमध्ये घसरण 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर शुक्रवारी 30.01 रुपयांवर होता. आज ओला  इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर घसरुन 28.8 रुपयांपर्यंत आला. आज शेअर 7 टक्क्यांनी घसरुन 52 आठवड्यांच्या निचांकावर पोहोचला. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीची कामगिरी इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत कमजोर पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री केवळ 32 हजार यूनिट इतकी राहिली. यापूर्वी कंपनीची एका तिमाहीतील विक्री 1.25 लाख यूनिट होती. या सेक्टरमध्ये कंपनीच्या रँकिंगमध्ये देखील घसरण पाहायला मिळत आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनी 6 टक्के बाजारातील भागीदारीसह पाचव्या स्थानावर असल्याचा दावा एम के ग्लोबलचा आहे. एम के ग्लोबलनं ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या स्टॉकचं रेटिंग BUY वरुन SELL केलं आहे. 

ब्रोकरेज फर्मला आता ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अस्तित्त्वाबाबत संशय वाटू लागल्यानं त्यांच्याकडून रेटिंग कमी करुन SELL कॅटेगरीत आणलं आहे. Emkay Global नं इलेक्ट्रिक व्हेईकल स्टॉकचं टारगेट प्राईस 60 टक्क्यांनी कमी केलं आहे. रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचं टारगेट प्राईस 20 रुपये करण्यात आलं आहे. सध्या ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं कंपनीचं बाजारमूल्य 12822 कोटी रुपये झालं आहे. 

दरम्यान, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आयपीओ ऑगस्ट 2024 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. तेव्हा ओलाच्या शेअरनं 157.4 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत ओला इलेक्ट्रिकचा शेअर 129 रुपयांनी घसरला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या वाहनांच्या विक्रीतील घसरणीमुळं कंपनीचा नफा घटला होता. आता कंपनीचा स्टॉक घसरताना पाहयला मिळतो आहे.  ओलाच्या शेअरमधील घसरण सुरुच राहणार की स्टॉकमध्ये पुन्हा तेजी येणार हे पाहावं लागेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्याचा नियम बदलला, मोफत व्यवहारांनंतर 15 रुपये शुल्क घेणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी 
स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलला 

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget