Emcure Pharma IPO: एमक्युअर फार्मास्यूटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या कंपनीचा आयोपीओ येणार आहे. 3 जुलैपासून गुंतवणूकदार या आयपीओत पैसे गुंतवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने आयपीओचा किंमत पट्टाही (प्राईस बँड) ठरवलेला आहे. या आयपीओच्या मदतीने एमक्युअर फार्मास्यूटिकल्स एकूण 1952.03 कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. या आयपीओच्या माध्यातून एकूण 800 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर जारी केले जाणार आहेत. तर 1152.03 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून जारी केले जातील.  


शेअरचा किंमत पट्टा किती आहे. 


एमक्युअर फार्मास्यूटिकल्स (Emcure Pharma) या कंपनीने आपल्या आयपीओसाठी किंमत पट्ट्याची घोषणा केली आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 960 ते 1008 रुपये असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करायीच असेल तर कमीत कमी 14 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल. किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी 14 शेअर्सचा एक लॉट आणि जास्तीत जास्त 196 शेअर्सचे 14 लॉट्सवर बोली लावू शकतो. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 14,112 रुपयांपासून 1,97,568 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या कंपनीचे शेअर BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहेत.  


कंपनी पैसे कुठे गुंतवणार 


या आयपीओसाठी कंपनीने कोटक महिंद्रा बँक कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅक्सिस कॅपिटल लिमिडेट यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केलं आहे. आयपीओच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या रकमेतून 600 कोटी रुपयांच्या माध्यमातून कंपनी कर्ज फेडणार आहे. मार्च 2024 पर्यंत या कंपनीवर 2,091.90 कोटी रुपयांचे कर्ज झालेले आहे. तर उर्वरित रकमेचा वापर अन्य कार्यालयीन कामासाठी केला जाणार आहे. 


या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?


एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीचा विस्तार युरोप, कॅनडापर्यंत झालेला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने आपल्या कमाईतील 48.28 टक्के कमाई ही भारतातून केलेली आहे. एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीचा आयोपीओ गुंतवणुकीसाठी 3 ते 5 जुलै या कालावधीसाठी खुला असेल. त्यानंतर 8 जुलै रोजी शेअर्सचे वितरण होईल. 9 जुलै रोजी अयशस्वी गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जातील.  ही कंपनी शेअर बाजारावर 10 जुलै रोजी सूचिबद्ध होईल.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


आयटीआर ते क्रेडिट कार्डचे नियम! वाचा जुलै महिन्यात कोणकोणते नियम बदलणार!


'या' स्मॉल कॅप शेअरने वर्षभरात दिले 165 टक्क्यांनी रिटर्न्स, भविष्यातही गुंतवणूकदारांना करणार मालामाल?


हजारो कोटी लुबाडणाऱ्या 'क्रिप्टोक्वीन'चा अमेरिकेला शोध, शोधणाऱ्याला मिळणार 42 कोटींचं बक्षीस!