'या' स्मॉल कॅप शेअरने वर्षभरात दिले 165 टक्क्यांनी रिटर्न्स, भविष्यातही गुंतवणूकदारांना करणार मालामाल?

Man Industries Return: स्मॉल कॅप कॅटेगिरीतील हा शेअर सध्या चांगलाच तेजीत आहे. या शेअरने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

man industries share price analysis (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
शेअर बाजारात सध्या स्मॉल कॅप कॅटेगिरीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतआहेत. अशाच एका शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलेच श्रीमंत केले आहे.
2/7
या स्मॉलकॅप शेअरचे नाव Man Industries असे आहे. शुक्रवारी सत्र चालू असतूना हा शेअर 5.60 टक्क्यांच्या तेजीसह 416.45 रुपयांपर्यंत गेला होता. दिवसाअखेर हा शेअर 4.77 टक्क्यांच्या तेजीसह 413.20 रुपयांवर स्थिरावला.
3/7
Man Industries या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात 20 तर 6 महिन्यांत 55 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली आहे.
4/7
गेल्या एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीने वर्षभरात 165 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच गेल्या एका वर्षात शेअरधारकांचे पैसे अडीच पटीने वाढले आहेत.
5/7
ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलनुसार Man Industries हा शेअर सध्या तेजीत असल्यामुळे भविष्यातही तो चांगला परतावा देऊ शकतो.
6/7
या ब्रोकरेज फर्मने या शेअरला बाय रेटिंग दिल असून 500 रुपयांचे टार्गेट दिले आहे. म्हणजेच हा शेअर भविष्यात 20 ते 25 टक्क्यांनी वाढू शकतो.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola