मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स 200 अकांच्या तेजीसह सुरु झाला होता. शेअर बाजारात सेन्सेक्स 81036.22 अकांवर खुला झाला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 80956.33 अकांवर होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी-50 देखील 10.30 अकांनी वाढून 24.467.45 वर बंद झाला. शुक्रवारी बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, शुक्रवारचा दिवस एका शेअरनं गाजवला. लिस्टिंगच्या दिवशीच शेअर बाजारात त्याची जोरदार चर्चा होती. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ काल शेअर बाजारात लिस्ट झाला. त्या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 99.75 टक्के परतावा दिला. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे एका दिवसात दुप्पट झाले.
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ लिस्ट
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ शेअर बाजारात 6 डिसेंबरला लिस्ट झाला. याच दिवशी या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे दुप्पट झाले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट झाला होता त्यांनी दमदार कमाई केली. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेडनं 29 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला केला होता. तर, 3 डिसेंबरपर्यंत आयपीओसाठी बोली लावता येणार होती. 6 डिसेंबरला आयपीओ भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाला.
पहिल्याच दिवशी आयपीओला जोरदार प्रतिसाद
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ पहिल्याच दिवशी 1.48 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 2.43 पट, गैरसंस्थात्कमक गुंतवणूकदारांकडून 1.24 पट आयपीओ सबस्क्राइब केला होता. आयपीद्वारे कंपनीनं 1.18 कोटी शेअर जारी केले आहेत. ज्याचं मूल्य 98.6 कोटी आहे.काल शेअर बाजार बंद झाला तेव्हा गणेश इन्फ्रावर्ल्डचा शेअर 165 रुपयांवर आहे.
कंपनी काय करते?
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड (Ganesh Infraworld Limited) भारतातात औद्योगिक कन्स्ट्रक्शन प्रकल्प, निवासी आणि व्यावसायिक इमारतिचींची निर्मिती, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रस्ते बांधणी, रेल्वे-रस्ते प्रकल्प, पाणी पुरवठा प्रकल्पांची उभारणी करते.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)