RBI Repo Rate News : नवीन घराची (New Home) खरेदी करणाऱ्यांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षात (2025) गृहकर्जदारांना व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 2 वर्षांपासून आरबीआयने रेपो रेट (RBI Repo Rate) 6.5 टक्क्यांवर जैसे थे ठेवले आहेत. ज्यामुळं सामान्यांवर महागाई आणि ईएमआयचे दुहेरी संकट ओढवलं आहे. मात्र, अशातही आरबीआयने व्याजदरात कोणतीही कपात केली नाही. मात्र, नवीन वर्षात व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


दरम्यान, नवीन वर्षात कर्जदारांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.  RBI ने सलग अकराव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तज्ज्ञांच्या मते व्याजदर कपातीचा निर्णय 2025 च्या सुरुवातीला होण्याचा अंदाज आहे.


बँकांकडे जास्त पैसा येणार, गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार


आरबीआयने CRR 4.5 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ज्यामुळं बँकांकडे जास्त पैसा येतील. याचा परिणामी म्हणून गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमी व्याजदरामुळं ईएमआयचा बोजा कमी होईल, कर्ज घेणे सोपे होईल. गृहनिर्माण आणि लघुउद्योग यासारख्या क्षेत्रांना चालना मिळेल ज्याचा फायदा म्हणजे की आर्थिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कर्जदारांवरील आर्थिक बोजा कमी होईल. त्यामुळं नवीन घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 


नवीन वर्षात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता 


दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महागाईचा दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, नवीन वर्षात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. त्यामुळं महागाईचा दर कमी आल्यास व्याजदरात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. फेब्रुवारी महिन्यात दरात कपात होण्याची शक्यता आहे.  RBI रेपो दरात कपात केलेली नाही पण मध्यवर्ती बँक 2025 मध्ये आगामी MPC बैठकांमध्ये व्याजदर कपात करण्याची दाट शक्यता आहे. रेपो रेट 6.5 टक्क्यांवरुन 6 टक्के होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.