मुंबई : ओवॅइस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंग लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येऊन अद्याप सहा महिने झालेले नाहीत. तरीदेखील अवघ्या सहा महिन्यांच्या आता या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. ओवॅइस मेटल (Owais Metal) या कंपनीचा आयपीओ या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात आला होता. आयपीओमध्ये या कंपनीच्या शेअरचे मूल्य तेव्हा फक्त 87 रुपये होते. शुक्रवारी 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली. सत्राअखेर हा शेअर 1335 रुपयांवर बंद झाला. या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 1569 रुपये तर गेल्या 52 आठवड्यातील किमान मूल्य 231.35 रुपये आहे.


इश्यू प्राइसच्या तुलनेत 1400 टक्क्यांनी वाढला शेअर 


ओवॅइस मेटल  (Owais Metal) या कंपनीचा आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना या आयपीओत 28 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा होती. ही कंपनी 4 मार्च 2024 रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली. सुचिबद्ध होताना या शेअरचे मूल्य 250 रुपये होते. हा शेअर ज्या दिवशी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला, त्याच दिवशी त्याचे मूल्य 262.50 रुपयांपर्यंत वाढले. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली. 16 ऑगस्ट 2024 रोजी या शेअरचे मूल्य 1335 रुपये झाले होते. म्हणजेच 87 रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत ओवॅइस मेटल या कंपनीच्ये शेअरमध्ये तब्बल 1400 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.  
 
ओवॅइस मेटल (Owais Metal) हा आयपीओ 221.18 पट सबसक्राईब झाला होता. हा आयपीओ आला तेव्हा रिटेल इनवेस्टर्सना फक्त 1 लॉट घेण्याची मुभा होती. या आईपीओच्या एका लॉटमध्ये तेव्हा 1600 शेअर्स होते. म्हणजेच रिटेल इन्हेस्टर्सना या कंपनीच्या आयपीओमध्ये कमीत कमी 139200 रुपयांची गुंतवणूक करावी लागली.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मोठी बातमी! एसबीआयच्या व्याजदरात वाढ, आता EMI मध्ये होणार वाढ; सामान्यांच्या खिशाला झळ


IPO Update : दोन दिग्गज कंपन्यांचे लवकरच येणार आयपीओ, पैसे घेऊन राहा तयार!


फक्त 'या' एका योजनेत करा गुंतवणूक, रिटायरमेन्टनंतर कधीच येणार नाही पैशांची अडचण!