Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) चांगली सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे भारतीय बाजारावर चांगला परिणाम दिसून येत असून भारतीय शेअर बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. आज बँकिंग (Banking), ऑटो (Auto), ऑइल (Oil) आणि गॅस (Gas) शेअर्समधील घोडदौडमुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
'अशी' झाली शेअर बाजाराची सुरुवात
आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 334.32 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 57,963.27 च्या पातळीवर उघडला. याशिवाय, एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टी (Nifty) 72 अंकांच्या म्हणजेच 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 17,060.40 वर उघडला.
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती
आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात BSE सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत आणि NSE निफ्टीमधील 50 पैकी 34 शेअर्स नफ्यात व्यवहार करत आहेत. 16 शेअर्समध्ये घट नोंदवली जात आहे.
'या' कारणांमुळे बाजारात तेजी
आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांना मजबूती मिळाली आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. क्रेडिट सुईस वाचवण्याच्या करारानंतर सोमवारी यूएस स्टॉकमध्ये वाढ झाली. यासोबतच मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्याच्या प्रयत्नांमुळेही गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय, या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने दर वाढीला विराम दिला आहे. या सर्व कारणांमुळे आज शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे.
कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-घसरण?
आज बाजारात आयटी, एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहे. मीडिया शेअर्स तेजीत आघाडीवर असून त्यामध्ये 1.2 टक्के वाढ झाली आहे. पीएसयू बँकेचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी वाढले आहेत. तेल आणि गॅस यासोबत ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर्स 0.71 टक्क्यांनी वधारले आहेत. फायनँशियल सर्विस सेक्टर 0.55 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार सुरू आहे.
सोमवारी शेअर बाजारात घसरण
या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. FMCG क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. शेअर बाजारात सोमवारी मोठी अस्थिरता दिसून आली. काल बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 361 अंकांची घसरण झाली होती तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 111 अंकांची घसरण झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :