एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात घोडदौड, सेन्सेक्स 57750 तर निफ्टी 17000 पार

Share Market Updates : देशांतर्गत शेअर बाजारात आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सची तेजीत 57750 च्या पुढे झाली आहे.

Share Market Opening Bell : आज देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीची (Nifty) घोडदौड सुरु आहे. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सची (Share Market Updates) सुरुवात तेजीत 57750 च्या पुढे झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करत असल्याचे दिसते. त्याचवेळी निफ्टीनेही जोरदार व्यवहार करताना 17000 चा आकडा ओलांडला आहे. 

Share Market Opening Bell : शेअर बाजारात तेजी

देशांतर्गत शेअर बाजाराने (Stock Market) आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी जोरदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या सत्रात मेटल (Metal), रियल्टी (Realty) आणि फायनॅन्स (Finance) संबंधित क्षेत्रातील शेअर्स तेजीत दिसत आहेत. आज, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 22 पैशांच्या वाढीसह उघडला. रुपयाने 82.37 च्या तुलनेत 81.15 प्रति डॉलरवर उघडला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात तेजीत व्यवहार करताना दिसत आहेत.

Share Market Opening Bell : सेक्टरची परिस्थिती काय?

फार्मा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्ससह तेल आणि गॅस सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व सेक्टर तेजीत व्यवहार करत आहेत. रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.40 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे आणि त्यानंतर फायनॅन्स सेक्टरमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

Share Market Opening Bell : चांगल्या जागतिक संकेताचा परिणाम

चांगल्या जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार आज तेजीसह उघडला. सिंगापूर स्टॉक एक्सचेंज (SGX) निफ्टी जवळपास 70 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. सध्या, निफ्टी 44.80 अंकांच्या म्हणजेच 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 17030 च्या आसपास दिसत आहे. सेन्सेक्स 245.06 अंकांच्या म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 57898 च्या जवळ व्यवहार करत आहे. दुसरीकडे सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स 127 अंकांच्या वाढीसह 57654 वर बंद झाला. तर, निफ्टी 41 अंकांच्या वाढीसह 16986 च्या पातळीवर बंद झाला.

Share Market Opening Bell : कोणते शेअर्स तेजीत?

इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एचयूएल, टायटन, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी आणि एनटीपीसी या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Share Market Opening Bell : कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

सध्या बाजारात मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, सन फार्मा, बजाज फायनान्स, नेस्ले, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget