एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे.

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीसह (Share Market Opening Bell) सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताने भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) 59,196.96 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 17,568.15 अंकांवर खुला झाला. 

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी दिसून आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांनी वधारत 59,288.54 अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी वधारत 17,573.25 अंकावर व्यवहार करत होता. 

'शेअर इंडिया' चे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज दिवसभर बाजार  17300-17600  अंकांच्या दरम्यान व्यवहार करण्याची अधिक शक्यता आहे. आज बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मीडिया, ऑटो, रियल्टी आणि एनर्जी क्षेत्रात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. फार्मा, वित्तीय सेवा, आयटीसह स्मॉलकॅपमध्ये विक्री दिसू शकते. 

बँक निफ्टीतही आज तेजी राहण्याचा अंदाज डॉ. रवी सिंह यांनी वर्तवला. बँक निफ्टी 40200-40700 या दरम्यान व्यवहार करण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

सेन्सेक्समध्ये आज 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी दिसून आली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंटस, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

तर, आयटीसी, विप्रो, टीसीएस, एचयूएल, नेस्ले इंडस्ट्रीज, टाटा स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

मंगळवारी बाजारात तेजी 

मंगळवारी शेअर बाजार (Share Market Closing Bell) बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 549 अंकाची वाढ नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी175 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,960 अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,487 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 398 अंकांची वाढ होऊन तो 40,318 अंकांवर पोहोचला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Reliance Jio: रिलायन्स जिओचा मोठा डाव; हायस्पीड 5 जी साठी 'या' कंपन्यांसोबत मोठा करार

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरीची मोठी संधी! पगार मिळणार 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार, काय आहे पात्रता? कुठे कराल अर्ज 
बँकेत नोकरीची मोठी संधी! पगार मिळणार 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार, काय आहे पात्रता? कुठे कराल अर्ज 
9 ते 5 ची नोकरी सोडली, कंटेंट क्रिएशनची आवड जोपासली, अल्पावधीतच साराने मिळवले तब्बल  82.27 लाख रुपये 
9 ते 5 ची नोकरी सोडली, कंटेंट क्रिएशनची आवड जोपासली, अल्पावधीतच साराने मिळवले तब्बल  82.27 लाख रुपये 
ना धोका ना कोणती भीती! 5 वर्षात 5 लाख रुपये मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे जबरदस्त योजना
ना धोका ना कोणती भीती! 5 वर्षात 5 लाख रुपये मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे जबरदस्त योजना
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget