Share Market Opening Bell : शेअर बाजारात आजही चांगली तेजी (Share Market Opening Bell) असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे (Sensex 60000 Points). जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे.


आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक (Sensex) 95.84 अंकांनी वधारत 59,938.05  अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी (Nifty) निर्देशांक 42 अंकांनी वधारत 17,868 अंकांवर खुला झाला. 


सकाळी 9.29 वाजता सेन्सेक्स 161 अंकांनी वधारत  60,008.11 अंकांवर पोहचला होता. त्यानंतर पुन्हा खाली घसरला.  सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 185 अंकांनी वधारत 60,027.58 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 63 अंकांनी वधारत 17,888.35 अंकांवर व्यवहार करत आहेत. 


आज मुंबई शेअर बाजारातील एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अॅण्ड टी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, नेस्ले, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवरग्रीड, सन फार्मा सारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 


SGX Nifty प्री-ओपनिंगमध्ये  17904 अंकांच्या पातळीवर गेला होता.  निफ्टी निर्देशांक 10 अंकांनी वधारत 17833.55 अंकांवर व्यवहार करत होता. तर, बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 11 अंकांनी वधारत 59853.6 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 


मंगळवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 0.67 टक्क्यांची वाढ होऊन 59,863 तो अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर पोहोचला होता. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज 207 अंकांची वाढ होऊन तो 39,249 अंकांवर पोहोचला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: