Share Market Opening Bell: शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. बाजारात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.
शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 397.39 अंकांनी घसरत 56,710 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 136.85 अंकांनी घसरत 16,870 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 56,728.45 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 16,896.70 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, उर्वरित 26 शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 9 शेअरमध्ये तेजी दिसत असून 41 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीड, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅब आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीनंतर विप्रोच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये पॉवरग्रीड, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅबसह सिप्ला आणि आयशर मोटर्सच्या शेअर दरात उसळण दिसून आली.
भारती एअरटेल, टीसीएस, एल अॅण्ड टी, नेस्ले, एसबीआय, टीसीएस, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे.
प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. निफ्टीत 156 अंकांच्या घसरणीसह 16856 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्समध्ये 407 अंकांच्या घसरणीसह 56700 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
मागील सहा दिवसांपासून अमेरिकन शेअर बाजारात घसरण सुरू आहे. त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आशियाई शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढवल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: