Tata Tiago EV : टाटा मोटर्स (TATA Motors) आज सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक कार Tiago EV असेल. कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. Tiago EV प्रथम ऑटो एक्सपो 2018 मध्ये शोकेस करण्यात आला होता, परंतु कंपनीने तो लॉन्च केला नाही. त्याऐवजी, Tata Motors ने Nexon EV, Nexon EV Max आणि Tigor EV लाँच केले. आता, जागतिक ईव्ही दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे. Tata Tiago EV ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असल्याने ती भारतीय बाजारपेठेत Tata Tigor EV शी स्पर्धा करू शकते. परंतु सध्याच्या काळात ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील एकमेव इलेक्ट्रिक कार असेल.


कंपनी 10 इलेक्ट्रिक कार लाँच करणार
कंपनाच्या माहितीनुसार टाटा सध्या EV पोर्टफोलिओ तयार करण्यार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना 10 इलेक्ट्रिक वाहने अनेक सेगमेंट, बॉडी स्टाइल आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये लॉन्च करायची आहेत. त्याच्याकडे आधीपासूनच टिगोर ईव्ही जी कॉम्पॅक्ट सेडान आहे आणि नेक्सॉन ईव्ही जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. आगामी Tiago EV ही हॅचबॅक आहे. Tiago EV हे टाटा मोटर्सचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहन आहे. सध्या टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त कार Tigor EV आहे. त्याची किंमत 12.5 लाख रुपये आहे. पुढील कारची किंमत यापेक्षा कमी असेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.


अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी
या कारमध्ये अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल टाटा मोटर्स तेच Ziptron तंत्रज्ञान Tiago EV साठी वापरेल अशी अपेक्षा आहे, जे ते Tigor EV आणि Nexon EV साठी वापरत आहेत. Ziptron तंत्रज्ञान Xpres-T तंत्रज्ञानापेक्षा अधिक प्रगत आहे, जे पूर्वी टिगोर ईव्हीसाठी वापरले जात होते..


रेंज काय असेल?


मिळालेल्या माहितीनुसार, Tiago EV ची रेंज पाहता यामध्ये 26kWh चा बॅटरी पॅक असू शकतो. तसेच, यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणे अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. 


कारचे फिचर्स आणि किंमत
सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. Tiago EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील.


संबंधित बातम्या


Tata Motors Mini Truck: मजबूत आणि जबरदस्त! टाटाने लॉन्च केले 3 मिनी ट्र्क


KTM ने लॉन्च केल्या दोन स्पेशल एडिशन बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI