IAF Women Pilots : आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. सैन्य दलातही 'स्त्री शक्ती'चं दर्शन घडतं आहे. भारतीय हवाई दलात (Indian Air Force) महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या हवाई दलात 1300 महिला अधिकारी कार्यरत आहेत. भारत-चीन सीमेवर भारतीय महिला वैमानिक विमान आणि हेलिकॉप्टर उडवत देशाचं संरक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. आता हवाई दलातील महिला वैमानिकही देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण तयारीसह सज्ज आहेत. आसामजवळील भारत-चीन सीमेवर फायटर जेट उडवत महिला पायलट देशाचं संरक्षण करत आहेत. मंगळवारी आसाममध्ये तीन महिला वैमानिकांनी लढाऊ विमानं उडवत शत्रूली आपली ताकद दाखवून दिली आहे. सीमेवर सैनिकांच्या बरोबरीने महिला वैमानिकही देशाचं संरक्षण करत आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरवर तीन महिला वैमानिकांचे फोटो शेअर केले आहे. महिला वैमानिक अरुणाचल प्रदेश-आसामच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवत आहेत. मंगळवारी सुखोई-30 फायटर जेटमधून महिला वैमानिकांनी उड्डण केलं. याचे फोटो समोर आले आहेत. आसाममधील तेजपूर येथील पूर्वी सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून यांनी सुखोई-30मधूल उड्डाण केलं. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी देशातील एकमेव महिला वैमानिक आहे, ज्या सुखोई विमानाच्या शस्त्र प्रणालीचे पायलटिंग म्हणजेच वेपन सिस्टीम ऑपरेटींग (Sukhoi Su-30 Weapon System Operator) करण्यात सक्षम आहे.
'स्त्रिया बंधनातून मुक्त होतं आहेत'
भारतातील एकमेव Su-30 MKI वेपन ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी यांनी सांगितलं की, 'स्त्रिया बंधनातून मुक्त होतं आहेत. काही हुशार महिला होत्या ज्यांनी मर्यादा तोडली आणि आमची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला. महिलांनी फायटर जेट उडवणे आता नवीन गोष्ट नाही. हवाई दलात पुरुष आणि महिलांसह प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो आणि त्यांना समान प्रशिक्षण दिले जाते. आम्ही समान पातळीवर आहोत. पूर्वेकडील क्षेत्रात आमचे पायलट कोणत्याही प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत.'
महिलांना हवाई दलात प्रवेश
अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्यासह तीन महिलांना फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळाल्यावर भारतीय वायुसेनेने प्रथमच महिलांना हवाई दलात प्रवेश दिला. त्यानंतर भावना कंठ मिग-21 मधून उड्डाण करणाऱ्या पहिली महिला वैमानिक ठरली. त्यानंतर शिवांगी सिंह राफेल विमान उडवरी महिला पायलट ठरली. सध्या हवाई दलात महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.