(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell : शेअर बाजारात नफावसुलीचे संकेत, सेन्सेक्समध्ये घसरण
Share Market Opening Bell : शेअर बाजारात नफावसुलीचे संकेत दिसत आहेत.बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे.
Share Market Opening Bell : बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आल्यानंतर (Share Market) आज नफावसुली होत असल्याचे संकेत दिसून येत आहे. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. एसजीएक्स निफ्टीचीही सुरुवात घसरणीसह झाल्याने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होणार असल्याचे संकेत सकाळी दिसून आले होते.
शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये (Nifty) घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 17,888.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 206 अंकांच्या घसरणीसह 60,053.71 अंकांवर व्यवहार करत होता.
आशियाई बाजारपेठेत सुस्ती दिसून आली. तर, चीनमध्ये मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या संकेत देण्यात आली आहे. याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.
प्री-ओपनिंग सत्राची सुरुवात कशी?
शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 181 अंकांची घसरण झाली. निफ्टीत 45 अंकांची घसरण होऊन 17898.65 अंकांवर व्यवहार करत होता.
बुधवारी शेअर बाजारात तेजी
बुधवारी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 417 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, निफ्टीमध्ये 119 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,260 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,944 वर पोहोचला. सेन्सेक्सने 5 एप्रिलनंतर बुधवारी पहिल्यांदाच 60 हजारांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारात 1941 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1401 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 119 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.