एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे', सेन्सेक्स 1200 अंकांनी आपटला

Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे.

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या (Share Market Crash) पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. एसजीएक्स निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. 

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात शेवटच्या काही तासांत मोठी घसरण झाली होती. महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर बाजार बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासात अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामुळे अमेरिकेत मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची दाट शक्यता होती. 

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61  अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता. 

निफ्टीतील स्मॉलकॅप 100, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, पीएसयू बँक निर्देशांकात 2.51 टक्के णि मेटलमध्ये 2.44 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.  बँक निफ्टीतही दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टी निर्देशांकातील सर्व 50 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 30 शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीत 823 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 38154 अंकांवर व्यवहार करत आहे.  

शुक्रवारी बाजारात अस्थिरता 

शेअर बाजारात शुक्रवारी अस्थिरता दिसून आली होती. बाजार बंद होताना शेअर बाजार काहीसा सावरल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 59 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 36 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,833 अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये आज 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,558 अंकावर पोहोचला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget