Stock Market Updates : शेअर बाजारात हाहा:कार दिसून आला. चौफेर विक्रीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. ओमायक्रॉनचे संकट आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेल्या विक्रीचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. मागील आठवड्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.
आज सकाळी बाजार उघडताच मोठी घसरण दिसून आली. काही वेळेनंतर बाजार सावरेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, घसरणीचे सत्र सुरूच राहिले. आज दुपारी दोन वाजेपर्यंत शेअर बाजारात 1434.73 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्स 55,577.01 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टीमध्ये 454 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 16536.15 अंकावर ट्रे़ड करत होता. निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. निफ्टी 500 अंकाखाली घसरला होता. निफ्टीने 16500 चा स्तरही तोडला होता. मात्र, काही वेळेनंतर पुन्हा सावरला.
बँक निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. बँक निफ्टीत मोठी विक्री झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत बँक निफ्टी 1407.20 अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी 34,227 अंकावर ट्रेड करत होता. बँक निफ्टीतील सर्वच स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.
डिसेंबर महिन्यात एफआयआयने शेअर बाजारातून 26000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ओमायक्रॉनच्या परिणामाशिवाय, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नफावसुली सुरू आहे. याच्या परिणामी बाजारात घसरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
शेअर बाजारच्या प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 500 अंकाहून अधिक अंकाने घसरून 56,500 अंकांवर स्थिर राहिला. बाजार सुरू होताच, सेन्सेक्समध्ये 675 अंकापेक्षा अधिक घसरण झाली. तर, निफ्टीमध्येही 218.10 अंकांनी घसरून 16765 अंकावर आला. काही वेळेनंतर निफ्टीमध्ये आणखी घसरण झाली. बाजार सुरू होताच सुरू झालेली घसरण काही वेळेनंतर सावरेल असा अंदाज होता. मात्र, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1035.86 अंक म्हणजे 1.82 टक्क्यांनी घसरला. एनएसई निफ्टी 32 अंकांनी 1.90 टक्क्यांनी घसरला आणि 16,662.20 अंकांवर व्यवहार करत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: