Share Market Closing Bell : या आठवड्यात सलग तिसऱ्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू असल्याने शेअर बाजार वधारला. आज दिवसभरातील व्यवहार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 54481 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांकात 87 अंकांनी वधारत 16220 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला.
शेअर बाजार ऑटो, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया आदी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. तर, एफएमसीजी, ऑइल अॅण्ड गॅस, एनर्जी, बँकिंग, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू आदी क्षेत्रांमधी शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 32 शेअर वधारले होते. तर, 18 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी होती.
शेअर बाजारात आज वधारणाऱ्या शेअर्समध्ये एल अॅण्ड एटी 4.74 टक्के, पॉवरग्रीड 2.94 टक्के, टाटा मोटर्स 2.48 टक्के, एनटीपीसमध्ये 2.31 टक्के, कोल इंडियाच्या शेअर दरात 2.04 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये 1.98 टक्के, आयसीआयसीआय बँकेत 1.85 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 1.72 टक्के, अॅक्सिस बँकेत 1.67 टक्के, डॉ. रेड्डीजचा शेअर 1.61 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.
तर, एचडीएफसी लाइफमध्ये 1.67 टक्के, ओएनजीसी 1.62 टक्के, टाटा स्टील 1.57 टक्क्यांची घसरण दिसून आली. मारुती सुझुकीमध्ये 1.52 टक्के, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.44 टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात 1.24 टक्के आणि हिंदाल्कोच्या शेअर दरात 1.13 टक्क्यांची घसरण दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: