Tata Technologies IPO :  जवळपास 18 वर्षानंतर टाटा समूहातील कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा ( Tata Technologies)आयपीओ दाखल होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी  प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिस याच्याशी निगडीत आहे. आता या कंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.  टाटा मोटर्सकडून जर हा आयपीओ आला तर,  टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा पहिलाच आयपीओ असणार आहे. 


जवळपास 18 वर्षांपूर्वी टाटा समूहातील आणि देशातील मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेजचा (TCS) आयपीओ आला होता. त्यावेळी रतन टाटा  हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.  आता , एन. चंद्रशेखरन यांनी 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतर टाटा समूहातील कंपनीचा हा पहिला आयपीओ असणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा आकार किती असेल, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या आयपीओची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आयपीओ प्रक्रियेत देशांतर्गत बँकांसह परदेशी बँकांनाही सामावून घेतले जाणार आहे. 


टाटा मोटर्सच्या वर्ष 2022 च्या वार्षिक अहवालानुसार, टाटा टेक्नॉलॉजीमध्ये टाटा मोटर्सचा 74 टक्के समभाग आहे. वर्ष 2018 मध्ये टाटा मोटर्स हा टाटा टेक्नॉलॉजीमधील 43 टक्के हिस्सा हा 360 दशलक्ष डॉलरमध्ये वारबर्ग पिनकस (Warburg Pincus) यांना विकणार होते. मात्र, या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. 


टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे उत्पन्न 2021--22 मध्ये 3529.6 कोटी रुपये होते. या वर्षात 645.6 कोटी रुपये ऑपरेटिव्ह प्रॉफिट आमि 437 कोटींचा निव्वळ नफा झाला होता.  टाटा टेक्नॉलॉजीकडून  ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल मशिनरी आणि उद्योगांवर भर दिला जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: