Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता लवकरच बेयर ग्रील्सच्या शो मध्ये झळकणार आहे. या आधी या शोमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, आणि विक्की कौशल देखील या शोमध्ये झळकले होते. मात्र, यावेळी या शोमध्ये आणखी जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. हा शो मागील सीझनपेक्षा वेगळा असणार आहे. या शोमध्ये आता रणवीर सिंहने नेमकं काय काय करावं, हे प्रेक्षक सांगणार आहे.


यावेळी रणवीर सिंह बेयर ग्रील्ससोबत सर्बियाच्या जंगलात फिरताना दिसणार आहे. रणवीरने कोणकोणते टास्क करावेत हे आता प्रेक्षक ठरवणार आहेत. हा शो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शो चा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. अवघ्या 30 सेकंदाचा हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडीओ :



या व्हिडीओत रणवीर सिंह डायनिंग टेबलवर बसून झुरळ खाताना दिसत आहे. दुसरीकडे तो जंगलात भटकताना दिसत आहे. यासोबतच नेटफ्लिक्सने हटके कॅप्शनही दिले आहे. हा शो आज (8 जुलै) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  


आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त अभिनेता!


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर नुकताच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात दिसला होता. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 15.59 कोटींची कमाई केली. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत होता, जो आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करतो आणि बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. रणवीर सिंहच्या या व्यक्तिरेखेचे ​​प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसली होती. आता रणवीर सध्या त्याच्या आगामी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.


हेही वाचा :


Ranveer Singh Birthday : रणवीर सिंहचा 37 वा वाढदिवस; जाणून घ्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरबाबत...


अॅड एजन्सीमध्ये नोकरी ते बॉलिवूड स्टार; अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंह कोट्यवधींचा