Devendra Fadnavis : मी आणि एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वी एकत्र शपथ घेतली. आज आपल्यासोबत आमच्या सरकारमध्ये हा पहिला कार्यक्रम आहे, आपलं सरकार उंच भरारीसाठी तयार आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.


2030 पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल - फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे, राज्याची अर्थव्यवस्था 7 ट्रिलियनपर्यंत जाऊ शकते, 2014 मध्ये आपण संकल्प घेतला होता, 2030 पर्यंत आपण 1 ट्रिलियनपर्यंत जाऊ, 2030 पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. समाजातील शेवटच्या घटकाला देखील आम्ही समाविष्ट करण्याचा विचार करतो. रस्त्यांचं नेटवर्क चांगलं बनलं असून नवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण करण्याचा विचार असल्याचं फडणवीस म्हणाले. इतिहासात झालेल्या चुकीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, भविष्यातील रोडमॅप हा आपल्याकडे असायला हवा.जोपर्यंत ठराव होत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. त्यामुळे संकल्पाचे रूपांतर सिद्धीमध्ये करावे लागेल. भारताने मोठी झेप घेतली आहे. 7 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्नही पूर्ण होईल. आपले नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. असं फडणवीस म्हणाले


समृद्धी महामार्ग : लवकरच एक टप्पा सुरू होणा


फडणवीस पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गाची योजना मी आणि एकनाथजींनी केली असून लवकरच लोकांसाठी एक टप्पा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाने रस्त्यांच्या जाळ्याचे काम वेगाने केले. नवी मुंबई विमानतळाचे काम मेट्रो वेगाने करेल. कधी-कधी आपल्या विकासकामांवर राजकारणाचे वर्चस्व असते. बुलेट ट्रेनचे काम महाराष्ट्रात जलदगतीने होईल, बुलेट ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल. यावर मुख्यमंत्री एकनाथजी यांच्याशी चर्चा झाली असल्याचं फडणवीस म्हणाले. काही कारणांमुळे बुलेट ट्रेनमध्ये आम्ही मागे राहिलो. एक बुलेट ट्रेन बनणार त्यातून एक इको सिस्टिम बनणार आहे. तसेच जेएनपीटीवरुनही मोठा पोर्ट बनवण्याचा विचार असल्याचं फडणवीस म्हणाले, अडचणी आल्या तर आम्ही त्या दूर करु, तसेच ठाकरे महामार्ग आम्ही बनवला असून लवकरच लोकांसाठी खुला होईल असंही त्यांनी सांगितलं


पब्लिक ट्रन्सपोर्ट आम्ही ग्रीन फ्युअलवर नेण्याचा विचार 


पब्लिक ट्रन्सपोर्ट आम्ही ग्रीन फ्युअलवर नेण्याचा विचार करतोय. स्टेट ट्रान्सपोर्टला देखील आम्ही ग्रीन फ्युअलवर नेऊ. ईव्हीत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार होईल. देशातील गुंतवणूकदारांना आव्हान करतो की, आम्ही यात काम करु पाहतोय आणि पुढे जाण्याचा विचार करतोय. गडकरींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु