मुंबई: शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 542 अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 145 अंकांची घसरण झाली. निफ्टी बँकमध्येही (Nifty Bank) आज 482 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आज लाखो कोटींचे नुकसान झालं आहे.
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 0.82 टक्क्यांची घसरण होऊन तो 65,240 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.74 टक्क्यांची घसरण होऊन तो 19,381 अंकांवर पोहोचला. आज एकूण 1758 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1702 शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच 145 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना फार्मा इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली तर मेटल, ऑईल अँड गॅस, रिअॅलिटी इंडेक्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली. UPL, Titan Company, Bajaj Finserv, ONGC आणि ICICI Bank यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली तर Adani Enterprises, Eicher Motors, Divis Labs, Infosys आणि Adani Ports निफ्टीमध्ये वाढ झाली.
शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात सेन्सेक्समध्ये 1300 हून अधिक अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. या वर्षी मार्च महिन्यापासून शेअर बाजारात तेजी आहे. त्यानंतर सेन्सेक्सस आणि निफ्टीने वाढीचा नवा विक्रम नोंदवला. पण गेल्या दोन दिवसात सेन्सेक्समध्ये 1300 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे.
आज जगभरातल्या सर्व प्रमुख शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं. यामध्ये आयटी आणि फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वत्र घसरण झाली आहे. 1 ऑगस्ट रोजी अमेरिकन रेटिंग एजन्सी फिचने अमेरिकेतील सॉवरेन रेटिंगमध्ये घट केल्याचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं.
रूपयाची घसरण
शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम रुपयाच्या किमतीवर झाल्याचं दिसून आलं. आज डॉलरच्या तुलनेत रूपयाची 15 पैशांनी घसरण होऊन तो 82.73 वर बंद पोहोचला.
शेअर बाजारात बुधवारीही मोठी घसरण झाली होती. बुधवारी सेन्सेक्स 677 अंकांनी घसरला होता तर निफ्टीही 207 अंकांनी घसरला होता. बुधवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल 3.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं.
या कंपन्यांचे शेअर्स वाढले
- Adani Enterprises - 2.39 टक्के
- Adani Ports- 1.56 टक्के
- Eicher Motors- 1.41 टक्के
- Divis Labs- 0.97 टक्के
- Infosys - 0.55 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
- UPL- 3.02 टक्के
- Titan Company- 2.52 टक्के
- ICICI Bank- 2.22 टक्के
- ONGC- 2.19 टक्के
- Bajaj Finserv- 2.18 टक्के
ही बातमी वाचा: