Canada PM Divorce : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) आणि त्यांची पत्नी सोफी (Sophie Trudeau) विभक्त होणार असल्याचं सांगितलं आहे. ट्रूडो यांनी बुधवारी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत ही घोषणा केली. कॅनडाचे पंतप्रधान (Canada Prime Minister) जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत यासंंबंधित माहिती देत सांगितलं की, जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटाच्या कायदेशीर करारावर स्वाक्षरी केली आहे. या जोडप्याने 18 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मोठी घोषणा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''सोफी आणि मी हे सांगू इच्छितो की, अर्थपूर्ण आणि कठीण संभाषणानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत राहून आणि आमच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू. आमच्या निर्णयाचा आदर करून सर्वजण आमच्या आणि आमच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्या आणि गोपनीयतेचा आदर करावा, ही अपेक्षा." सोफी ट्रूडो (Sophie Trudeau) यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासारखीच पोस्ट शेअर केली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांची इंस्टाग्राम पोस्ट
18 वर्षांनंतर पत्नी सोफीपासून विभक्त होण्याचा निर्णय
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, "त्यांनी वेगळे होण्याच्या निर्णयासंदर्भात सर्व कायदेशीर आणि नैतिक पावले उचलली आहेत. पुढेही हे करत राहतील." जस्टिन ट्रूडो 51 वर्षांचे आणि तर सोफी 48 वर्षांच्या आहेत. 2005 च्या अखेरीस जस्टिन ट्रूडो आणि सोफी यांचं लग्न झाला होतं. त्यांना तीन मुले आहेत. ते 18 वर्षांपासून एकत्र होते आणि आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
दोघं मिळून करणार मुलांचं संगोपन
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "ते एक कुटुंब म्हणून एकत्रल राहतील आहेत. सोफी आणि पंतप्रधान जस्टिन ट्रूडो त्यांच्या मुलांचे सुरक्षित, प्रेमळ आणि आश्वासक वातावरणात संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. पुढील आठवड्यापासून ट्रूडो कुटुंब सुट्टीवर जाणार आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :