एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: गुंतवणूकदारांच्या नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 1000 अंकांनी आपटला

Share Market Closing Bell: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांच्या नफावसुलीने बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

Share Market Closing Bell: आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला. जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 59000 अंकांखाली आहे. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1093 अंकांच्या घसरणीसह 58,840 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 345 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17530 अंकांवर बंद झाला. 

शुक्रवारी, शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. दिवसभर झालेल्या चौफेर विक्रीमुळे सर्वच सेक्टरमध्ये घसरण झाली. गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टी निर्देशांकात आज 1.05 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटोमध्ये 2.71 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 3.71 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 1.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टीतील 50 पैकी फक्त 2 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरित 48 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एका शेअरमध्ये तेजी दिसून आली. उर्वरित 29 शेअर्समध्ये घसरण दिसली. 

आज झालेल्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारात आज 3610 कंपन्यांपैकी 980 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसली. तर, 2525 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 105 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.

आज दिवसभरातील व्यवहारात इंडसइंड बँक 2.63 टक्के, डेल्टा कॉर्प 1.83 टक्के, मॅक्स फायनान्शियल 1.22 टक्के, सिप्ला 0.99 टक्के, गेल 0.77 टक्के, इंडस टॉवर 0.22 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.

तर, अल्ट्राटेक सिमेंट 4.51 टक्के, टेक महिंद्रा 445 टक्के, इन्फोसिस 3.69 टक्के, महिंद्रा 3.52 टक्के, विप्रो 3.19 टक्के, टीसीएस 3.08 टक्के, नेस्ले 3.02 टक्के, रिलायन्स 2.44 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. 


शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण झाली आहे. गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली आहे. त्याशिवाय, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही घसरण विक्रीचा दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स  348.29  अंकांच्या घसरणीसह 59,585.72 अंकांवर खुला झाला आहे. तर निफ्टी निर्देशांक 80.602 अंकांच्या घसरणीसह 17,796.80 अंकांवर खुला झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget