SIP Calculator मुंबई: म्यूच्यूअल फंडमध्ये सिस्टीमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅननुसार ऑक्टोबर हमहिन्यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीनं जुनी रेकॉर्ड मोडली आहेत. ऑक्टोबर महिन्यात एसआयपी गुंतवणूक 25 हजार कोटींवर पोहोचली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एसआयपीद्वारे म्यूच्यूअल फंडसमध्ये 25,323 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रक्कम वाढली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एसआयपीतून गुंतवणूक 24,509 कोटी रुपये झाली होती. गेल्यावर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक 16,928 कोटी रुपये झाली होती.
म्यूच्यूअल फंडस चालवणाऱ्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची संस्था एम्फी (Asssociation of Mutual Funds in India) नं ऑक्टोबर 2024 मधील म्यूच्यूअल फंडात आलेल्या गुंतवणुकीची माहिती जारी केली आहे. या डेटानुसार ऑक्टोबर महिन्यात इक्विटी म्यूच्यूअल फंडात इनफ्लोमध्ये 21.69 कोटी रुपयांची वाढ झाली असून तो 41887 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 44 महिन्यांपासून इक्विटी म्यूच्यूअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तीन सेगमेंटच्या फंडमध्ये जोरदार गुंतवणूक वाढली आहे.
एम्फीच्या आकडेवारीनुसार लार्ज-कॅप फंडमध्ये 3452 कोटी रुपये, मिड कॅप फंड्समध्ये 4883 कोटी आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये 3771 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात झाली. ऑक्टोबर महिन्यात हायब्रिड फंडमध्ये सर्वाधिक 16863.3 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.त्यापूर्वीच्या महिन्यात 4901 कोटी रुपये होती. सेक्टरोल आणि थीमॅटिक फंडमध्ये गुंतवणुकीत घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये 13255 कोटी रुपयांची तर ऑक्टोबर महिन्यात 12278 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
सर्व म्यूच्यूअल फंडची अॅसेट अंडर मॅनेजमेंट रक्कम ऑक्टोबर महिन्यात 67.25 कोटी रुपये झाली. ती सप्टेंबर 2024 मध्ये 67.09 कोटी रुपये होती.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरणीचं चित्र पाहायला मिळालं. आठवड्यातील दोन दिवस वगळता इतर दिवसांमध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम देखील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात निफ्टी 50 मध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली.
इतर बातम्या :