Share Market Opening Bell: सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) केलेल्या व्याज दरवाढीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 74 अंकांच्या घसरणीसह 62,603 अंकांवर खुला झाला. निफ्टी (Nifty) निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 18,642 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 276 अंकांच्या घसरणीसह 62,401.47 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 80 अंकांच्या घसरणीसह 18,580.10 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारात घसरण होत असताना दुसरीकडजे बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, रिअल इस्टेट, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसत आहे. तर, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे.
बाजारात घसरण होत असताना दुसरीकडजे बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, रिअल इस्टेट, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसत आहे. तर, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, 22 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. निफ्टी 50 मधील 15 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदी दिसत असून 35 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
आज इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.21 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. सन फार्माच्या शेअर दरात 0.46 टक्के, स्टेट बँकेच्या शेअर दरात 0.34 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.26 टक्के, डॉ. रेड्डी लॅबच्या शेअर दरात 0.06 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.05 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, एशियन पेंट्स आणि टायटनच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ
अमेरिकेतील महागाई दरात घट झाली असली तरी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पु्न्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. महागाई दरात घट झाल्यानंतर फेडरल रिझर्व्हने काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली आहे. मागील बैठकीत फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्क्यांची व्याज दरवाढ केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: