एक्स्प्लोर

दोन वर्षापूर्वीची चूक SBI ला महागात पडली; अंक ओळखीत गोंधळ केल्याने द्यावी लागणार नुकसानभरपाई

SBI News: ग्राहक तक्रार निवारण मंचाने 85 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank Of India) दोन वर्षांपूर्वी केलेली एक चूक महागात पडली आहे. या चुकीबद्दल स्टेट बँकेला आता ग्राहकाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्याला चेकवरील क्रमांक व्यवस्थित वाचता आला नाही. त्यामुळे त्याने चेक पुन्हा पाठवला. त्यानंतर संबंधित ग्राहकांने ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर (Consumer Forum) दाद मागितली. 

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमधील हुबळी शहरातील हे प्रकरण आहे. हुबळीतील एका महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक वादिराजाचार्य इनामदार  यांनी वीज बिल भरण्यासाठी एक चेक दिला होता. एसबीआय बँकेचा हा चेक सहा हजार रुपयांचा होता. हुबळी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेडच्या (HESCOM )नावाने हा चेक 3 सप्टेंबर 2020 रोजी काढण्यात आला होता. HESCOM चे बँक खाते कॅनरा बँकेत आहे. त्यामुळे हा चेक वटवण्यासाठी एसबीआयच्या शाखेत पाठवण्यात आला होता. त्यानंतर हे सगळे प्रकरण सुरू झाले.

कॅनरा बँकेने हा सहा हजार रुपयांचा चेक वटवण्यासाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातील हलियाल येथील एसबीआयच्या शाखेत पाठवण्यात आला होता. या चेकवर भरलेली माहिती कन्नड भाषेत नमूद केलेली होती. चेकवरील आकडे कन्नड भाषेत होते. एसबीआय शाखेतील कर्मचाऱ्याने कन्नडमधील 9 अंकाला 6 समजले. हा अंक चेकवरील तारखेच्या महिन्याच्या कॉलमध्ये नमूद होता. त्यामुळे हा चेक जून महिन्यातील आहे, असा समज एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्याचा झाला. त्यामुळे तीन महिने उलटून गेल्याने या कर्मचाऱ्याने हा चेक पुन्हा माघारी पाठवला. त्यामुळे वीज बिल न भरले गेल्याने इनामदार यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

चेक पुन्हा पाठवल्याने प्राध्यापक इनामदार यांनी आपली ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तक्रारीवर दोन वर्षानंतर निकाल जाहीर करण्यात आला. एसबीआयने या प्रकरणाला गांभीर्याने घेत एसबीआयला 85 हजार 177 रुपयांचा दंड ठोठावला. बँकेने ग्राहकाला नुकसान भरपाई आणि दंड म्हणून ही रक्कम द्यावी असे ग्राहक तक्रार निवारण मंचाने आदेश दिले. बँकेत त्रि-भाषिक सूत्राचा अवलंब केला जातो. त्यामुळे स्थानिक भाषेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी.एस. नागभरण यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Embed widget