मुंबई : अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) हा संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वसामान्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान नोकदार वर्गाला सर्वात जास्त अपेक्षा असते ती पगारवाढीच्या घोषणांची. पण यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र नोकदार वर्गाचा मात्र हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्या दृष्टीने फारश्या महत्त्वाच्या घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आल्या नाहीत. पण या सगळ्यामध्ये नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आलीये. ज्या गोष्टीची संपूर्ण महिनाभर नोकरदार वर्ग वाट पाहत असतो, त्या पगाराला यंदाच्या महिन्यात मात्र एक दिवस उशीर होणार आहे. 


खरंतर फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पगार हा लवकर होईल अशी अपेक्षा नोकरदार वर्गाला असते. पण 2024 हे लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील दिवस हे 29 आहेत. फेब्रुवारी महिन्यात लवकर पगार होणार या आशेने बऱ्याच गोष्टी अनेकांच्या प्रीप्लॅन असतात. पण यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात हा पगार 29 तारखेला होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये महिनाअखेरला शनिवार आणि रविवार आल्याने बऱ्याच नोकरदार वर्गाचे पगार हे 29 डिसेंबर रोजीच झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात पगार हा 31 जानेवारी रोजी झाला. त्यामुळे अधिकचे तीन दिवस नोकरदार वर्गाचा कस लागल्याचं पाहायला मिळालं. 


लीप वर्ष म्हणजे काय?


दर चार वर्षांनी लीप वर्ष येत असते. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात. ज्यावर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो, त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. पृथ्वी स्वत: भोवती फिरते यासाठी 24 तास लागतात, असं आपण मानतो. मात्र वैज्ञानिकदृष्ट्या ही वेळ 23 तास 56 मिनिट 4 सेकंट एवढी आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, असं म्हटलं जातं. मात्र ती खरी वेळी 365 दिवस 5 तास 48 मिनिच आणि 5 सेकंद एवढी आहे.सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस आणि जवळपास 6 तास लागतात. अशा प्रकारे जर हे 6 अतिरिक्त तास एकत्र केले गेले तर चार वर्षात 24 तास म्हणजे एक दिवस पूर्ण होतो. मग हा अधिकचा एक दिवस चौथ्या वर्षात लीप डे म्हणून समाविष्ट केला जातो.


ही बातमी वाचा : 


Uddhav Thackeray :भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा! दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही, उद्धव ठाकरेंचा थेट वार