कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur loksabha) आणि हातकलंगले लोकसभा (hatkanangale lok sabha constituency) मतदारसंघासाठी जोरदार चर्चा सुरू असतानाच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणांहून लोकसभेसाठी चाचपणी सुरू केली असतानाच कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही
दरम्यान, आज (1 फेब्रुवारी) महाविकास आघाडीकडून त्यांना काही अटींवर उमेदवारीची चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली कोल्हापूर लोकसभेला इच्छुक असतील तर त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करून मगच उमेदवारी घ्यावी, अशी अट घालण्यात आल्याचे समजते. या सर्व पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आता खुलासा केला आहे. त्यांनी ट्विट करत खुलासा करत म्हटलं आहे की, स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माजी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.
त्यांनी लोकसभा 2024 असा ट्विटमध्ये हॅशटॅग वापरला आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती यांनी आज काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला असा दावा करण्यात आला असला तरी सद्यस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसशी बोलणी केल्याचे समजते. राजे उमेदवारीचा विचार करताना काँग्रेसचा पर्याय निवडणार का? अशी चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांनी नकार दिल्याचे समजते. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा असेल असे म्हटले होते. त्यानंतर अचानक संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवतात की स्वराजला महाविकास आघाडीचा घटक पक्ष करून उमेदवारी मिळवतात? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या