मुंबई: सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारलेला पाहायला मिळाला. आज सेन्सेक्स 935 तर निफ्टी 240 अंकांनी वधारला. आंतराराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाचे दर उतरल्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर होताना दिसला. रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे येत्या काळात शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाचा प्रति बॅरल 140 डॉलरवर गेलेला भाव प्रति बॅरल 110 रुपयांवर आला आहे. त्याशिवाय तेल उत्पादक देशांनीही आपलं उत्पादन वाढवायला सुरुवात केली आहे. युरोपियन देशही निर्बंध न लागल्यामुळं रशियाकडून तेल घेत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर बाजार सावरताना दिसलाच, पण देशांतर्गत बाजारही सावरला.
भारताला रशियाची ऑफर
रशियानं भारताला कच्चं तेल सवलतीच्या दरात ऑफर केलं आहे. त्यामुळं प्रति बॅरल 110 डॉलरवर असलेलं कच्चं तेल भारताला प्रति बॅरल 70 ते 75 डॉलर दरात मिळू शकतं. पण केंद्र सरकारनं याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्याचा परिणाम येत्या काळात शेअर बाजारावर दिसणार असून बाजार तेजीत राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
शेअर बाजार सावरला
रशिया-युक्रेन युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावरून हटल्याचं दिसून येतंय. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारला असून आज आज बाजार बंद होताना सेन्सेक्स 935 अंकांनी वधारला तर निफ्टीही 240 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,486.02 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,871.30 वर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या: