Crude Oil Price At Record High : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude Oil Price) उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2008 नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 147 डॉलर प्रति बॅरल रेकॉर्ड स्तर गाठला आहे. 


रशिया युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. आजही युद्धाचा वणवा पेटताच आहे. युक्रेनमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्यानं जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत. दुसरीकडे या युद्धामुळे आता कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. 2012 साली ही किंमत 128 डॉलर्सवर पोहोचली होती. मात्र आता तोही रेकॉर्ड आता तुटला आहे. कच्च्या तेलासोबतच अॅल्युमिनियम, कॉपर, झिंकनं देखील 15 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. युद्धामुळं मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. या आठवड्यातही बाजारावर युद्धाचे विपरित परिणा दिसण्याची शक्यता आहे. 


जागतिक बाजारपेठेत इराणी कच्च्या तेलाच्या (Iranian Crude Oil) संभाव्य पुरवठ्यात विलंब झाल्यामुळं तेलाच्या किमती 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. रविवारी संध्याकाळी 6:50 पर्यंत, ब्रेंट $11.67, किंवा 9.9% ने वाढून $129.78 प्रति बॅरलवर पोहोचलं. EST (2350 GMT), तर US West Texas Intermediate (WTI) क्रूड $10.83, किंवा 9.4%, $126.51 वर वाढलं. रविवारी ट्रेडिंगच्या काही मिनिटांतच, दोन्ही बेंचमार्कनं जुलै 2008 नंतरची सर्वोच्च पातळी $139.13 प्रति बॅरल गाठली. 


पाहा व्हिडीओ : 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका



कच्चं तेल 185 डॉलरवर पोहोचणार? 


जेपी मॉर्गन यांनी भाकीत केलं आहे की, जर 2022 मध्ये संपूर्ण वर्षभर रशियाचा आवक पुरवठा सुरू राहिला. तर या वर्षी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 185 च्या किमतीला स्पर्श करू शकते. जेपी मॉर्गनच्या तज्ज्ञांच्या मते, जर रशियाकडून येणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम प्रतिदिन 3 दशलक्ष बॅरल म्हणजेच, रशियाकडून पुरवल्या जाणाऱ्या 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाच्या मागणीवर होईल. 


रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश 


रशियानं युक्रेनमधील युद्ध थांबवलं नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. ज्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. खरं तर, रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. रशिया 35 ते 40 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो. भारत रशियाकडून कच्चे तेलही खरेदी करतो. जगात पुरवल्या जाणाऱ्या 10 बॅरल तेलामध्ये एक डॉलर रशियाकडून येतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानं किमती आणखी वाढू शकतात. सध्या रशियातील 66 टक्के कच्च्या तेलाला कोणीही खरेदीदार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol-Diesel Price : देशात निवडणुकांचे वारे थांबरणार, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची धास्ती, उच्चांक गाठणार?