मुंबईभारतीय चलन रुपया (Indian Currency) अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत ऐतिहासिक घसरणीसह (Rupee Dollar ) बंद झाला आहे. 1 नोव्हेंबर 2023 रोजी रुपया 9 पैशांनी घसरला आणि 83.33 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नात झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनांची कमजोरी यामुळे रुपया कमजोर झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 83.29  वर बंद झाला होता, जो ऐतिहासिक नीचांक होता.


शेअर बाजारात (Share Market) विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत असून इस्रायल-हमास युद्धामुळे (Israel Hamas War) जागतिक राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) ऑक्टोबर महिन्यात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 25,575 रुपयांचे शेअर्स विकले आहेत. त्यामुळे ब्रेंट क्रूड 1.34 टक्क्यांच्या वाढीसह 86.16 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.


बुधवारी, चलन विनिमय बाजारात रुपया 83.26 च्या पातळीवर उघडला आणि 83.35 च्या नीचांकी पातळीवर गेला. विनिमय बाजार बंद झाल्यावर, रुपया प्रति डॉलर 83.33 (तात्पुरती) या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 रोजी रुपया एका डॉलरच्या तुलनेत 83.24 च्या पातळीवर बंद झाला होता.


दरम्यान, याआधी 16 ऑक्टोबर रोजीदेखील डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली होती. त्यावेळी रुपया 83.27 वर बंद झाला. त्यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाची होणारी मोठी घसरण थांबली होती. त्यानंतर रुपया सावरला होता. आज पुन्हा एकदा रुपयाची घसरण झाली. 


डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण सुरू राहिल्यास काय?


सोने खरेदी महागणार!


भारत सोन्याच्या प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. सणांचा हंगाम जवळ आला आहे. नवरात्री, धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत लोक सोने खरेदी करतात. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याची आयात महाग झाली, तर देशात सोन्याच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागेल. 


कच्च्या तेलाची आयात महागणार आहे


भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच रुपया कमकुवत झाल्यास आणि डॉलर वधारल्यास भारतीय ऑईल कंपन्यांना आयातीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :