एक्स्प्लोर

Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला; गाठला नवा नीचांकी दर

Rupee Falls Against Dollar: रुपयाची घसरण सुरू असून डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी दर गाठला आहे. एका डॉलरसाठी आता 78.23 रुपये मोजावे लागणार आहे.

Rupee Falls Against Dollar:  डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली ऐतिहासिक घसरण कायम सुरू आहे. रुपयाने पहिल्यांदाच एका डॉलरच्या तुलनेत 78 रुपयाचा स्तर गाठला. आज रुपयात 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री सुरू आहे. त्याच्या परिणामी रुपयातही घसरण सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रुपयात डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे. जागतिक पातळीवर असलेली अस्थिरता आणि वाढती महागागई यासारख्या कारणांमुळे गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढली जात आहे. रुपयाने आतापर्यंतचा नीचांकी दर 78.26 रुपये गाठला आहे. युक्रेन-रशिया युद्धाला 23 फेब्रुवारी 2022 रोजी सुरुवात झाली होती. त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.62 रुपयांवर होता. त्यानंतर रुपयात सातत्याने घसरण सुरू आहे. रुपयांच्या घसरणीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

रुपयात आज घसरण का?

अमेरिकेत महागाईचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.  महागाई दराचे आकडे समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आता वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा

परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे. 

FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget